घरमनोरंजनयामुळे ठरतेय ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांची लाडकी मालिका!

यामुळे ठरतेय ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांची लाडकी मालिका!

Subscribe

‘ह.म.बने तु.म.बने या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्न दृष्टीकोनावर आधारीत तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातलं नाट्य हलक्या फुलक्या शैलीत मांडलं आहे. ‘ह.म.बने तु.म.बने मालिकेला त्याच्या वेगळ्या विषयामुळे प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.

सोनी मराठी सुरू झालं आणि मराठी मालिकांच्या वाहिन्यांमध्ये आणखी एका वाहिनीची भर पडली. आता ही वाहिनी कोणते नवीन विषय घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. सोनी मराठी वाहिनीच्या अशाच ‘ह.म.बने तु.म.बने मालिकेला त्याच्या वेगळ्या विषयांमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

असं म्हंटल जातं की, ज्याप्रमाणे दोन बायका एकत्र आल्या की त्यांच्यात वाद हे होतातच. आजवर अनेक चॅनेल्सनी सासू-सुनेचं नातं विविध पैलूंद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ‘ह.म.बने तु.म.बने या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्न दृष्टीकोनावर आधारीत तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातलं नाट्य हलक्या फुलक्या शैलीत मांडलं आहे.

- Advertisement -

आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्ज्वला जोग, सचिन देशपांडे, अजिंक्य जोशी यांच्यासारख्या मातब्बर अशा तगड्या कलाकारांची फळी या मालिकेत आहे. तर केदार आगास्कर, सखी दातार, पूर्वी शाह या बच्चेकंपनीने या मालिकेत जान आणली आहे. या सगळया कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांचा मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन सचिन गोखले करत आहेत.

sony marathi new serial
हम बने तुम बने
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -