घरमनोरंजन“बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेने गाठला ५०० भागांचा पल्ला!

“बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेने गाठला ५०० भागांचा पल्ला!

Subscribe

मंडप सजलाय, तोरणं बांधली गेलीयेत, – दिव्यांच्या रोषणाईने सजलेला मंडप, सगळीकडे उत्सवाचं आणि आनंदाचं वातावरण… कारण आहे ५०० भागांच्या या उत्सवपर्वाच…गेलं वर्षभर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही आपली लाडकी मालिका पूर्ण करतेय ५०० भागांचा यशस्वी टप्पा… या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे…संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे … याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी… सद्गुरू श्री मनोहर मामांच्या मार्गर्दशनाखाली, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीने, तसच प्रेक्षकांच्या प्रेमाने हे शिवधनुष्य ५०० भागांपर्यंत समर्थपणे पेललंसुद्धा…. नुकतच कलर्स मराठी आणि मालिकेच्या टीमने ५०० भागांच उत्सवपर्व साजरे केले…उत्सवपर्वचा हाच आनंदमयी सोहळा पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर रहाण सोप नाही… यामध्ये संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच हे उत्सवपर्व मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ, मंडळी ज्यांनी बाळूमामांचा जीवन प्रवास सत्यात उतरविण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास सद्गुरू श्री. मनोहरमामांची उपस्थितीत लाभली. याचसोबत बाळूमामांच्या लीला पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या शीर्षक गीताने विशेष भागाची सुरुवात झाली आणि संपूर्ण वातावरण एकाएकी भक्तिमय झाले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या तात्याच्या भूमिकेतील अक्षय टाक यांनी केले ज्याने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. उत्सवपर्वासाठी गोफनृत्य, धनगरी ओव्या, अतिशय सुंदररित्या सादर केले गेले. मालिकेमधील लोकप्रिय पाळणा सायली पंकज यांनी सादर केला… कलाकार, विशेष अतिथि यांच्या समावेत रंगलेल्या या उत्सवपर्वाची सांगता बाळूमामांच्या आरतीने झाली… हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि बाळूमामांच्या जयघोषात पार पडला यात शंका नाही. प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे बाळूमामा त्यांच्या लहानश्या भक्ताचा जीव कसा वाचवणार हे देखील बघायला मिळणार आहे.

ज्यांनी लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले “संत बाळूमामा” यांच्या आयुष्यातले किस्से ज्यांनी त्यांच्या लेखणीतून रंजकपणे लिखाणात साकारले आणि बाळूमामांचा जीवन प्रवास प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचे शिवधनुष्य उचले ते म्हणजे संतोष अयाचित या खास क्षणाबद्दल बोलताना म्हणाले, “बाळूमामाच्या नावानं चांगभलं या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेचे ५०० भाग लवकरच पूर्ण होत आहेत. मराठीत या निमित्ताने एक वेगळी बायोग्राफी आणण्याचा प्रयत्न झाला.मुळतःवेगळी पार्श्वभूमी, वेगळा काळ, वेगळ्या व्यक्तीरेखा ह्या चरित्राच्या अनुषंगाने प्रेक्षकांसमोर आल्या. बाळूमामांचा कालखंड १८९२ ते १९६६ हा आहे ज्यात मामांनी पाच राज्ये पायी भ्रमण केली. ह्या भ्रमंतीत त्यांनी कोणताही भेद न मानता सर्व स्तरात अखंड काम केले. त्यांनी अंधश्रद्धा, वाईट चालीरीती बंद केल्या. प्राण्यांविषयी, निसर्गाविषयी ममत्व असावे हे शिकवलं. केवळ चमत्कारातुन नाही तर प्रत्यक्ष काम करून त्यांनी अनेकांचे आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलले. हे चरित्र साकारताना उत्कृष्ट तंत्रज्ञ ह्यावर काम करतात आणि तो काळ उभा करण्याचा प्रयत्न करतात. कलर्स मराठी वाहिनीचा ही कथा करण्याचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा ठरला”.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -