घरमनोरंजनअखेर प्रतिक्षा संपली! खिलाडी कुमारचा 'बेलबॉटम' या तारखेला होणार प्रदर्शित

अखेर प्रतिक्षा संपली! खिलाडी कुमारचा ‘बेलबॉटम’ या तारखेला होणार प्रदर्शित

Subscribe

कोरोना महामारीमुळे बॉलिवूडमधील अनेक चांगले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले होते, तर काही चित्रपटांना कोरोनामुळे थांबविण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बेलबॉटम असाच एक चित्रपट आहे जो एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. आता चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या माहितीनुसार हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. यासंदर्भात अक्षय कुमारने शुक्रवारी घोषणा केली. बेलबॉटम हा एक थ्रिलर चित्रपट असून अक्षयनेही त्याच अंदाजात प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. अक्षयने ट्विटरवर मिशन: मोठ्या पडद्यावर तुमचे मनोरंजन करणं. तारीख – १९ ऑगस्ट, २०२१. बेलबॉटमच्या आगमनाची मी घोषणा करीत आहे.

- Advertisement -

यावर्षी २ एप्रिल रोजी ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यानंतर १७ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये चित्रपटगृह न उघडल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता अक्षयने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. महामारीदरम्यान, बॉलिवूडचे सर्व चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ लागले. या दरम्यान, बेलबॉटमविषयी असाही अंदाज वर्तवला जात होता की, हा चित्रपट चित्रपटगृहांच्या ऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, परंतु निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आता नवीन प्रदर्शनाची तारीख येताच या चर्चा संपुष्टात आल्या आहेत.

‘बेलबॉटम’ चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ता देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मनोरंजनने भरलेला आहे. पूजा एंटरटेनमेंट वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निकिल आडवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच ‘बेलबॉटम’चे दिग्दर्शन रणजित एम तिवारी यांनी केले असून चित्रपटाची कथा असीम अरोरा आणि परवेज शेख यांनी लिहिली आहे.


Tokyo Olympics : भारताचं आणखी एक पदक निश्चित; बॉक्सर लोव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -