घरमनोरंजनBharti Singh : १२ दिवसांचे बाळ घरी ठेवून कामावर येताना खूप...

Bharti Singh : १२ दिवसांचे बाळ घरी ठेवून कामावर येताना खूप रडले, भारती सिंहची कबुली

Subscribe

पापाराझींशी बोलताना भारती सिंह म्हणाली की, 'आज सकाळी मी कामावर येताना खूप रडले. १२ दिवसांच्या लहान बाळाला सोडून मी कामावर आले आहे.

कॉमेडियन भारती सिंहने ३ एप्रिल रोजी एका मुलाला जन्म दिला. आई झाल्यावर प्रत्येक स्त्री काही काळ विश्रांती घेते.
परंतु भारती मात्र मुलाच्या जन्माच्या अवघ्या १२ दिवसांनी पुन्हा कामावर परतल्याचे दिसतेय. भारतीने कामावर येताच पापाराझींसमोर आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली की, बाळाला घरी ठेवून कामावर येताना ती खूप रडल्याचेही तिने सांगितले.

भारती सिंहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंह पापाराझींसोबत बोलताना आणि फोटोमध्ये पोज देताना दिसत आहे. पापाराझींशी बोलताना भारती सिंह म्हणाली की, ‘आज सकाळी मी कामावर येताना खूप रडले. १२ दिवसांच्या लहान बाळाला सोडून मी कामावर आले आहे. परंतु काम हे काम आहे आणि ते केलेच पाहिजे.’ त्यानंतर ती म्हणाली की, ‘मी आता सर्वांना मिठाई खाऊ घालणार आहे’, असं म्हणत भारती सिंह व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाऊ लागली.

- Advertisement -

मुलाच्या जन्मापर्यंत काम करत होती भारती!

 

View this post on Instagram

 

A post shared by CineRiser (@cineriserofficial)

- Advertisement -

 

भारतीचं तिच्या कामावर प्रचंड प्रेम आहे, बाळाच्या जन्माच्या दिवसापर्यंत भारती कामावर जात होती. मात्र आता सुद्धा अशा नाजूक अवस्थेत  १२ दिवसाच्या चिमुकल्याला घरी ठेऊन भारती कामावर परतली आहे. भारतीला पुन्हा कामावर रुजू झालेलं पाहून तिचे काही चाहते खूप खूश होऊन तिचं कौतुक करत आहेत,तर काहीजण नाराजी व्यक्त करत आहेत. भारतीच्या या कठोर निर्णयामुळे काहीजण तिचे अभिनंदन करत आहेत, तर काहीजण तिला आराम करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच सोशल मीडियावरील काही तिचे चाहते तिच्या मुलाला वेळ देण्यास सांगत आहेत.

हेही वाचा :Ranbir Alia Wedding: लायकी कळाली ना, KRKने आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडची उडवली खिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -