घरमनोरंजनभिकारी फिल्म माफियाने माझ्या... कंगनाने केली बॉलिवूडवर टीका

भिकारी फिल्म माफियाने माझ्या… कंगनाने केली बॉलिवूडवर टीका

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा कंगना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांनवर संताप व्यक्त करत असते. अशातच कंगनाने आणखी एक नवं ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये कोणाचही नाव न घेता कंगनाने अनेक तिखट शब्दात टीका केली आहे. कंगनाच्या या ट्वीटवर अनेकजण प्रतिक्रिया देखील देत आहेत.

कंगना रनौतचं ट्वीट चर्चेत

कंगनाने तिच्या नव्या ट्वीटमध्ये कोणाचही नाव न घेता लिहिलंय की, “भिकारी फिल्म माफियाने माझ्या अभिमानाला माझा अहंकार म्हटलं. कारण मी दुसऱ्या मुलींप्रमाणे भीक मागण्यास नकार दिला. लग्नात नाचणं, रात्री कधीही बोलवल्यावर अभिनेत्यांच्या खोलीत जाण्यास नकार देणं. ज्यामुळे मला पागल ठरवण्यात आलं आणि तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.”

- Advertisement -

पुढच्या ट्वीटमध्ये कंगनाने लिहिलंय की, “हा अहंकार आहे की खरेपणा? स्वतःला सुधारण्याऐवजी ते मला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु खरं सांगायचं तर मला स्वतःसाठी काहीही नकोय, मी आत्ता माझं सर्व गहान ठेऊन एक चित्रपट बनवत आहे. राक्षसांचा नायनाट होऊल, कोणीही मला जबाबदार ठरवू नये.” असं कंगनाने लिहिलंय.

‘या’ चित्रपटात दिसणार कंगना

आगामी काळात कंगना इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. शिवाय कंगना ‘चंद्रमुखी 2’ मध्ये देखील दिसणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

आलियाने सेल्फी काढण्यासाठी मागितला सॅमसंगचा फोन; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -