घरमनोरंजनBigg Boss- घर नवीन सदस्यांनी गजबजणार !

Bigg Boss- घर नवीन सदस्यांनी गजबजणार !

Subscribe

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन तब्बल दोन वर्षांनी येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कार्यकर्मामध्ये कोणते नवे ट्विस्ट असतील, सदस्य कोण असतील याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.

“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या घरारात घुमला. असं घर ज्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. एक असा कार्यक्रम ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलसं केलं. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती. ज्या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.ते घर आता परत येत आहे खर्‍या अर्थाने एंटरटेनमेंट अनलॉक करायला. कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 3. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून आपण एक प्रकारची मरगळ, उदासिनता अनुभवत आहोत. पण आता खर्‍या अर्थाने मनोरंजनाचा तडका लागणार.  घरातील सदस्य आणि बाहेरील जग यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मागील दोन्ही पर्वांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाच्या अनोख्या पध्दतीमुळे आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे आणि मराठी माणसाला नेहेमीच आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत.

- Advertisement -

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन तब्बल दोन वर्षांनी येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कार्यकर्मामध्ये कोणते नवे ट्विस्ट असतील, सदस्य कोण असतील याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले, “मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती. प्रत्येकजण या वादळाला मोठ्या धीराने सामोरी गेलं आणि अजूनही जातं आहे. या सगळ्यामध्ये आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी परत येतोय महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठीचा नवा सिझनं घेऊन. बिग बॉस मराठीच्या येण्याने मी आशा करतो काही क्षणासाठी का होईना प्रेक्षकवर्ग त्यांचं दु:ख विसरेल. एका वर्षानंतर बिग बॉस मराठीचा नवा सिझन येतो आहे उत्सुकता तर नक्कीच आहे. मला खात्री आहे पहिल्या दोन्ही सिझनप्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मी सहभागी स्पर्धकांना या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो”


हे हि वाचा – नोरा फतेहीच्या हॉट लूकवर नेटकरी फिदा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -