घरताज्या घडामोडीयामुळे आता आमिर खानचा फोन राहणार बंद

यामुळे आता आमिर खानचा फोन राहणार बंद

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच करीना कपूर सोबत दिसणार

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होण्या अगोदर एक मोठी घोषणा केली आहे. सध्या या डिजिटल युगात प्रत्येकजण मिनिटा मिनिटाला आपला फोन चेक करत असतात, पण आमिर खानने आता चित्रपट रिलीज होईपर्यंत फोनचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खानने असं का केलं आहे ते जाणून घेऊयात.

आमिर खान नेहमी चित्रपटातील भूमिकेत परफेक्शन आणण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवर काम करत असतो. तो आपल्या भूमिकेचा खूप अभ्यास करतो. आता त्याने आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’साठी वेगळा मार्ग अवलंबला आहे. आमिरचे असं म्हणणं आहे की, फोनमुळे त्याचा कामात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या दरम्यान काही अडचण येऊ नये म्हणून आमिरने हे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

आमिरचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटात आमिर सोबत करीना कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आमिर आणि करीनाने यापूर्वी ‘३ इडियट्स’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात मोना सिंहने देखील प्रमुख भूमिकेत आहे. आता हे तिघे ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान आमिर खानचे ख्रिसमसच्या दिवशी रिलीज झालेले चित्रपट नेहमीच हिट झाले आहेत. मग तो पीके असो, दंगल असो किंवा धूम ३ असो. आमिर नेहमी आपल्या प्रोजेक्टमध्ये १०० टक्के योगदान देत असतो, त्यामुळे त्याचा प्रत्येक चित्रपट हिट ठरतो. माहितीनुसार आता आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील भूमिकेवर पूर्णपणे फोकस करत आहे.


हेही वाचा – दुसऱ्यांदा बाबा झालेला कपिल शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -