घरट्रेंडिंगस्वत:च्या लग्नात बेशुध्द पडलेले ऋषी कपूर, पत्नी नितू सिंग यांनी सांगितला किस्सा!

स्वत:च्या लग्नात बेशुध्द पडलेले ऋषी कपूर, पत्नी नितू सिंग यांनी सांगितला किस्सा!

Subscribe

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे मित्र महानायक अमिताभ बच्चन खूप दुखी आहेत. ऋषी कपूर अभिनेते म्हणून जितके चांगले होते तितकेच ते एक नवरा म्हणूनही उत्तम होते. खुद्द त्यांच्या पत्नी नितूंनी लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे.

ऋषी आणि नितू यांच लग्न २२ जानेवारी १९८०ला झाले. कपूर घराण्याच्या या लग्नात केवळ देशातील नाही तर परदेशातून अनेक लोकांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी असं काही घडलं की सगळेच खाबरले. एका मुलाखती दरम्यान नितू यांनी सांगितलेलं की लग्नाच्या वेळी ऋषी कपूर अचानक बेशुध्द पडले.

- Advertisement -

नितू सिंग म्हणाल्या की, लग्नाच्यावेळी आम्ही दोघेही बेशुध्द पडलो. मात्र दोघांची बेशुध्द पडण्याची कारणं वेगवेगळी होती. मी ळग्नात घातलेला लेहंगा सांभळताना बेशुध्द झाले होते. तर ऋषी कपूर आपल्या आजूबाजूला असलेली गर्दी बघून बेशुध्द झाले होते. लग्नात झालेली गर्दी ऋषी यांना सहन झाली नाही आणि ते बेशुध्द पडले. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर आमचं लग्न लागलं.


हे ही वाचा – ऋषी कपूर यांचे ‘हे’ ट्वीट ठरलं शेवटचं!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -