घरमनोरंजन#JamiaProtest: बॉलिवूड कलाकरांनी दिल्ली पोलीसांवर साधला निशाणा

#JamiaProtest: बॉलिवूड कलाकरांनी दिल्ली पोलीसांवर साधला निशाणा

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्या लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरचे पडसाद ईशान्य भारतात उमटून लागले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात ईशान्य भारतात आंदोलनाचे रुपांतर आता हिंसाचारात झाले आहे. अनेक ठिकाणी आंदोलक जाळपोळ करत असल्याच समोर आलं आहे. दिल्लीत देखील जामिया मिलिया इस्लमिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलना हिंसक वळणं लागलं असून दगडफेक वैगेर केली जातं आहे. या सर्व घटनेमुळे दिल्ली पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकर आपलं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतं आहेत. या सर्व परिस्थितीवर काही कलाकार पाठिंबा देत आहेत.

काय म्हणाले बॉलिवूड कलाकार?

बॉलिवूड अभिनेता झीशान अय्यूब याने पोलिसांवर निशाणा साधला आहे. त्याने असं ट्विट केलं आहे की, ‘जे लोक या क्षणी टाळ्या वाजवतं आहेत आणि शांत आहेत. घाबरू नका, जेव्हा हेच पोलिस आणि लोक आपल्याशी अशी वागणूक करतील तेव्हा देखील आम्ही आपल्यासाठीचं बोलू.’

- Advertisement -

प्रत्येक विषयावर प्रखर मत मांडणारी अभिनेत्री स्वरा भास्करने देखील याबाबत ट्विट केलं आहे. स्वरा भास्करने केलेले ट्विट हे नेहमीच चर्चेत असतात. तिने देखील जामिया विद्यापिठाच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. ती ट्विटमध्ये असं लिहिलं, ‘हिंसाचाराबाबत धक्कादायक संदेश, दिल्लीत विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखं का वागवलं जात आहे? वसतिगृहांमध्ये टीयर गॅसचा वापर का केला जातं आहे? हे काय सुरू आहे दिल्ली पोलिस?’

- Advertisement -

बिग बॉस सिझन १३ मधील घरातून बाहेर पडलेला स्पर्धक तहसीन पूनवाला यांने या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत लिहिलं की, ‘दिल्लीतील विद्यार्थी, मी सांगतो, तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची कायदेशीर, वैद्यकीय आणि अन्नाची मदत करिता माझे दरवाजे खुले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शांततेने आपणं निषेध करत राहू आणि या सरकारला आपलं विभाजन करू देणार नाही.’

तसंच ‘सेक्रेड गेम्स’ मधील अभिनेत्री कुबरा सैत हिने दिल्ली पोलीसांच्या विरोधात ट्विट केलं आहे. ती असं म्हणाली, ‘देशाच्या राजधानीची लाज वाटते. तसंच राजधानीतील पोलीसांची लाज वाटतं आहे.’

तापसी पन्नूने एनडीटीवीचा व्हिडिओ शेअर करत असं लिहिलं, ‘आश्चर्य आहे की ही नक्की सुरुवात का शेवट. हे निश्चित आहे की देशात नवीन नियम तयार करण्यास सुरुवात झाली आहे आणि जे या नियमात लोक बसत नाही त्याचे हे परिणाम दिसू येत आहेत. हा व्हिडिओ अंतःकरणाला आणि अपेक्षेला छेद करतो. मी फक्त जीवन आणि संपत्ती विषयी बोलत नाही.’

लोकप्रिय गायक अरमान मलिक याने देशातल्या या परिस्थितीबद्दल प्रार्थना करण्याबाबत बोला आहे. त्याने असं ट्विट केलं आहे की, ‘माझ्याकडे काही शब्द नाही आहे. देशात होणारे बलात्कार, आसाम आणि दिल्लीची स्थिती, भारतात सध्या खूप काही होत आहे. यासाठी फक्त प्रार्थना करा.’


हेही वाचा – जामिया आंदोलन: महिला पत्रकारासह पोलिसांचे गैरवर्तन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -