घरताज्या घडामोडीBunty Aur Babli 2 चा टिझर रिलीज, १२ वर्षांनी एकत्र दिसणार सैफ...

Bunty Aur Babli 2 चा टिझर रिलीज, १२ वर्षांनी एकत्र दिसणार सैफ आणि राणी मुखर्जी

Subscribe

सिनेमात दोन बंटी आणि बबली दिसणार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या सिनेमाची वाट पाहत होते तो सिनेमा म्हणजे बंटी और बबली २ ( Bunty Aur Babli 2)  या सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. २००५साली आलेल्या बंटी और बबली या सिनेमात अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन हे बंटी बबलीच्या प्रमुख भुमिकेत होते. मात्र आता बंटी बबली २ मध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल १२ वर्षांनी दोघेही एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. बंटी और बबली हा सिनेमा प्रेक्षकांसाठी नवी कॉडेमी घेऊन येणार आहे तसेच सैफ आणि राणी मुखर्जीची जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षकही चांगलेच उत्साही झाल्याचे पहायला मिळत आहे. सिनेमाच्या १.२६ सेकंदाच्या टिझरनेच प्रेक्षकांची सिनेमाप्रती असलेल्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

टिझरची सुरुवात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यासोबत होते. दोघेही आपल्या लुकला टच अप देत असतात. त्याचवेळी राणी सैफला आपण किती वर्षांनी एकत्र काम करतो ना असे म्हणते. सैफ म्हणतो १२ वर्षांनी त्यावर सैफ सोबत काम करणे मी फार मिस केले असे राणी त्याला म्हणते. सैफ आणि राणी एकमेकांच्या लुकचे कौतुक करत असतानाच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शार्वरी फ्रेममध्ये येतात. आम्ही सुद्धा शुटासाठी तयार आहोत. त्यावर राणी आणि सैफ त्यांना तुम्ही कोण असे विचारतात त्यावर दोघे आम्ही बंटी और बबली असे सांगतात. राणी इथे बंटी और बबली फक्त आम्हीच आहोत असे म्हणते. तर डिरेक्टर आदित्य चोप्राने स्क्रिप्ट चेंज केल्याचे सांगते.

- Advertisement -

एकंदरीतच टिझरवरुन सिनेमात दोन बंटी आणि बबली दिसणार हे स्पष्ट झालं आहे. सिनेमाचा टिझर फारच मजेशीर करण्यात आला आहे. सिनेमात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान सोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री शार्वरी देखील दिसणारआहेत. सिनेमा येत्या १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. खरंतर सिनेमा याआधीच रिलीज होणार होता मात्र कोरोना आणि लॉकडाऊमुळे सिनेमा मागे पडला.

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सैफ अली खानची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधी दोघे हम तुम, तारा रम पम, थोडा प्यार थोडा मॅजिक या सिनेमात एकत्र दिसले होते.

- Advertisement -

हेहे वाचा – फटाक्याच्या जाहिरातीमुळे आमिर खान ट्रोल; भाजप खासदाराने घेतला आक्षेप

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -