घरताज्या घडामोडीफटाक्याच्या जाहिरातीमुळे आमिर खान ट्रोल; भाजप खासदाराने घेतला आक्षेप

फटाक्याच्या जाहिरातीमुळे आमिर खान ट्रोल; भाजप खासदाराने घेतला आक्षेप

Subscribe

सध्या क्रिकेट वर्ल्ड कप आणि दिवाळीच्या निमित्ताने टिव्हीवर अनेक प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. यादरम्यान रस्त्यावर फडाके न फोडण्याचे आवाहन करणारी बॉलिवूड अभिनेता आमिर खानची जाहीर दाखवली जात आहे. परंतु या जाहिरातीमुळे आमिर खानला अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून आमिर खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. शिवाय कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेत एक पत्र लिहिले आहे.

भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या जाहिरातीमधील टायर कंपनीला पत्र लिहून आक्षेप घेतला आहे. त्यांनी भविष्यात कंपनी हिंदूंच्या भावनांचा आदर करेल आणि त्यांना दुखवणार नाही अशी आशा व्यक्ती केली आहे. कारण अशा प्रकरणाची जाहिरात हिंदूंमधील शांतता भंग करत आहे.

- Advertisement -

यापूर्वी आमिरच्या या जाहिरातीवरून चांगलाच वाद रंगला होता. आमिर खान हिंदू विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तो ट्रोल झाला होता.

आमिरच्या जाहिरातीमध्ये काय आहे?

सीएट टायरची आमिरची ही जाहीर आहे. यामध्ये आमिरन खान मुलांना समजावत असतो की, ‘अनार, सुतळी बॉम्ब, भुईचक्र.. आज जर आपली टीम जिंकली, तर आपण फटाके फोडू. परंतु सोसायटीच्या आतमध्ये. रस्ते गाडी चालवण्यासाठी, फटाके फोडण्यासाठी नाहीत.’ आमिर असं बोल्यानंतर एक व्हाईस सुरू होतो, ज्यात म्हटले जाते की, ‘एके दिवशी आपण असे समजूदार होऊ. परंतु तोपर्यंत स्विच टू सीएट सेक्युरिटी टायर.’

- Advertisement -

हेही वाचा – Drugs Case: Ananya Panday ची गुरुवारी दोन तास चौकशी, आज पुन्हा NCB करणार चौकशी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -