घर क्राइम अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल; महिलेला धमकावणे आणि आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण

अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल; महिलेला धमकावणे आणि आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण

Subscribe

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि बॉडी-बिल्डर साहिल खान (Sahil Khan) अडचणीत सापडला आहे. एका महिलेवर अश्लील कमेंट करणे आणि सोशल मीडियावर तिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी साहिल खानवर गुन्हा दाखल (A case has been filed against Sahil Khan for sharing offensive posts) करण्यात आला आहे. याशिवाय महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये (Oshiwara Police Station) साहिल खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाच – थाला ते थलपति, ‘या’ नावाने तमिळ superstar का ओळखले जातात?

- Advertisement -

मंगळवारी (18 एप्रिल) दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा दाखला देत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ओशिवरा परिसरातील रहिवासी असून तिचे फेब्रुवारी 2023 मध्ये जिममध्ये पैशांवरून एका महिलेशी भांडण झाले होते. यावेळी आरोपी महिला आणि साहिल खान यांने तक्रारदार महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली होती. साहिल खान याने आरोपी महिलेसोबत मिळून तक्रारदार महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांचा समावेश करत साहिल खान आणि त्याच्या सोबतच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलीस अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, आरोपी महिलेचे तक्रारदार महिलेच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिने पीडितेच्या पतीविरुद्धही पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत
साहिल खान याने आत्तापर्यंत स्टाइल, एक्सक्यूज मी, अलादीन आणि रामा: द सेव्हिअर हे त्यांचे प्रमुख चित्रपट काम केले आहे. सध्या तो बराच काळ अभिनयापासून दूर असला तरी तो नेहमी वादात सापडत असतो. अनेक अभिनेत्रींसोबतही त्यांचे नाव जोडले गेले. असे असले तरी तो सोशल मीडियावरही तो खूप प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर जिम संबंधित माहिती शेअर करत असतो.

- Advertisment -