बॉलिवूडमध्ये सुरवीन चावला, नेहा धूपिया आणि सौम्या टंडन यांना नुकतच मातृत्त्व प्राप्त झालं आहे. या यादीत आता आणखी एका टिव्ही अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्री छवि मित्तलने मुलाला जन्म दिला आहे. १२ मे ला मातृदिना दिवशी छविने या गोंडस मुलाला जन्म दिला. छविने इन्स्टाग्रामवर बाळाचा हात हातात घेतलेला छान फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही खूषखबर दिली. तब्बल १० महिन्यानंतर छविने या बाळाला जन्म दिला आहे.
छवि कायमच सोशलमिडीयावर सक्रीय असते. ती आपल्या प्रेग्नंसीचे अपडेट सोशलमिडीयावर नेहमी शेअर करत असे. प्रेग्नसीशी निगडीत छोट्या छोट्य गोष्टी तीने फॅन्सबरोबर शेअर केला. अरहामच्या आधी छवीला एक सहा वर्षाची मुलगी आहे. २००५ मध्ये छवि मोहित हुसैनबरोबर लग्नबंधनात अडकली होती. २०१२ मध्ये छवीने अरीजा या मुलीला जन्म दिला होता. आता छवि अरहामला जन्म देऊन पुन्हा एकदा आई झाली आहे.