घरमनोरंजनकॉम्रेड अजित अभ्यंकर 'लेथ जोशी' चित्रपटात

कॉम्रेड अजित अभ्यंकर ‘लेथ जोशी’ चित्रपटात

Subscribe

कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. १३ जुलैला प्रदर्शित होत असलेल्या ‘लेथ जोशी’ या चित्रपटात भांडवलदाराच्या भूमिकेत अजित अभ्यंकरांची महत्त्वाची भूमिका आहे.

कामगारांच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागरूक

अजित अभ्यंकर यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील पदार्पणाविषयी चर्चा आहे. अजित अभ्यंकर यांच्यासह या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. मंगेश जोशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कागणे स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

चित्रपट का निवडला?

‘गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान आणि त्याचं स्वरूप फारच वेगानं बदलत आहे. मोठ्या यंत्रांकडून छोट्या यंत्रांकडे आणि माहिती तंत्रज्ञानाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जगात भांडवलाला स्वातंत्र्य मिळालं आणि कामगार बंदिस्त झाल्याचा परिणाम झाला आहे. या सगळ्यात कामगाराची भांडवलाविरोधातील लढाशक्ती अधिकच क्षीण झाली. तंत्रज्ञानातील बदल अपरिहार्य असले, तरी या प्रक्रियेत कामगाराने जुळवून घेण्याबाबत काहीही विचार केला जात नाही. यंत्राच्या या दुनियेत यंत्राचं नटबोल्ट काढून फेकल्याप्रमाणं माणसं काढली जातात. हा विषय माझ्या मनात असतानाच हा चित्रपट माझ्याकडे आला आणि होकार दिला.’ असं मत यावेळी अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केलं. कॉलेजमध्ये नाटकांतून मी काम केलं होतं. मात्र, कॅमेऱ्यासमोर कधीच अभिनय केला नव्हता. या चित्रपटातून तंत्रज्ञानात बदलातील वास्तव अधिक सकसपणे मांडण्यात आलं आहे, असंही अभ्यंकर यांनी सांगितलं. अजित अभ्यंकरांनी नेहमीच कामगारांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळं या चित्रपटात अभिनेता नसूनही खऱ्या आयुष्यातील आपला बाज अजित अभ्यंकर पडद्यावर कसा साकारतील याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -