घरमनोरंजनदलेर नावाची लेहेर

दलेर नावाची लेहेर

Subscribe

अल्बमच्या युगात दलेर मेहेंदीची फक्त गाणीच प्रकाशित झाली नाहीत तर ती सर्वच्या सर्व लोकप्रिय ठरलेली आहेत. त्याची ही लोकप्रियता लक्षात घेऊन मृत्यूदाता या चित्रपटासाठी एक गाणे अमिताभबरोबर चित्रीत केले गेले होते. या गोष्टीला काही वर्षे उलटली आणि आता पुन्हा अमिताभ बच्चन बरोबर दलेरचे नाव जोडले जात आहे त्याला कारण म्हणजे बावली तारेड हे त्याचे गाणे व्हायरल झालेले आहे.

हरियाणाची प्रसिद्ध नृत्यांगणा सपना चौधरी हिच्याबरोबर हे गाणे चित्रीत झालेले आहे. अमिताभ बच्चन यांच्या पाहण्यात ते आले. लागलीच प्रतिक्रिया देणे हे अमिताभचे वैशिष्ठ्य राहिलेले आहे. दलेरच्या बाबतीतही तसेच घडलेले आहे. या नव्या गाण्यासाठी वाह क्या बात है पाजी, तुसी कमाल कर दी ता अशा शब्दात दलेरचे कौतुक त्याने केलेले आहे. दलेर नावाची लेहेर सध्या जिकडेतिकडे अनुभवायला मिळत आहे.

- Advertisement -

इतर गायकांप्रमाणे राजकारण काय आहे हे दलेरने अनुभवण्याचे ठरवलेले आहे. त्यासाठी त्याने भाजपमध्ये प्रवेशही केलेला आहे. राजकारणात त्याचे भवितव्य काय आहे हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे; पण त्याच्या या नव्या गाण्याला एका दिवसात दहा हजार लाईक्स् प्राप्त झालेल्या आहेत. चार लाख हिट्स मिळाल्याने आपली अद्याप चलती आहे याची जाणीव त्याला झालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -