घरमनोरंजन'दंगल'फेम नितेश तिवारी घेऊन येणार नवा चित्रपट

‘दंगल’फेम नितेश तिवारी घेऊन येणार नवा चित्रपट

Subscribe

'दंगल'फेम नितेश तिवारी लवकरच नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सनॉन ही जोडी दिसण्याची शक्यता आहे.

‘दंगल’नं दोन वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी आता २ वर्षांनी नवा चित्रपट बनवायला घेत आहे. याविषयी ट्विट करून नितेशनं माहिती दिली आहे. साजिद नाडियादवाला आणि फॉक्स स्टार स्टुडिओच्या सहयोगानं या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘दंगलनंतर आता मी साजिद नाडियादवाला आणि फॉक्स स्टार स्टुडिओ परिवाराचा भाग बनल्यानंतर आता मी कथा सांगण्याठी उत्सुक आहे.’ असं ट्विट नितेशनं केलं आहे.

- Advertisement -

नवा चित्रपट नवी जोडी

मिड – डे वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक नितेश तिवारीनं आपल्या नव्या चित्रपटासाठी नव्या जोडीचा विचार केला आहे. ही जोडी दुसरी – तिसरी कोणी नसून सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सनॉन आहेत. ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. २०१७ मध्ये सुशांत आणि क्रिती ‘राबता’मधून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आले होते. तेव्हा हा चित्रपट चालला नसला तरीही या जोडीबाबत खूप चर्चा झाली होती. सध्या नव्या चित्रपटाचे निर्माते इतर कलाकारांसहदेखील सध्या चर्चा करत आहेत. ‘बरेली की बर्फी’मध्ये क्रितीनं केलेल्या कामानं नितेश प्रभावित असल्यामुळं क्रितीच्या नावाची जास्त चर्चा आहे. दोघांचीही चर्चा झाली असून क्रितीचं नाव फायनल होईल अशी शक्यता आहे.

क्रिती सध्या चित्रपटात व्यस्त

अभिनेत्री क्रिती सॅननकडे सध्या बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. तर, लंडनमध्ये सध्या ‘हाऊसफुल ४’ च्या चित्रीकरणात व्यस्त असून या चित्रपचात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुशांतसिंह राजपूतदेखील नवे चित्रपट साईन करत असून नुकत्याच धोनी चित्रपटाच्या सिक्वललादेखील त्यानं आपली संमती दर्शवली आहे. तर लवकरच सुशांतचे ‘केदारनाथ’, ‘चंदा मामा दूर के’ आणि ‘सोनचिडीया’ हे चित्रपट येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -