घरमनोरंजनदेवबाभळी पुस्तकात अवतरली

देवबाभळी पुस्तकात अवतरली

Subscribe

प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रोडक्शन’च्या वतीने जेवढी म्हणून नाटके रंगमंचावर दाखल झाली, त्यात दखल घ्यावे असे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सांगता येईल. प्राजक्त देशमुख याने त्याचे लेखनदिग्दर्शन केलेले आहे. एकोणचाळीसच्या आसपास या नाटकाने पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. व्यावसायिक रंगभूमीसाठी प्रथमच लिखाण करणार्‍या प्राजक्तच्या या नाटकाचे पुस्तक प्रकाशन नाटककार, नाट्य अभ्यासक डॉ. राजीव नाईक यांच्या हस्ते झाले आहे. या निमित्ताने ‘देवबाभळी’ खर्र्‍या अर्थाने पुस्तकात अवतरली.

एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने प्राजक्तने ‘देवबाभळी’चे लिखाण केले होते. स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या या नाटकाचे दोन अंकात रुपांतर व्हावे अशी इच्छा दर्शवली, त्यातून ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक रंगमंचावर आले. प्रसाद कांबळी हे या नाटकाचे निर्माते आहेत. तुकारामाचे विठ्ठलाकडे पूर्ण स्वाधीन होणे हे त्याच्या पत्नीला मान्य नसते. ती विठ्ठलाचा तिरस्कार करते. मग साक्षात रुख्मिणी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या सान्निध्यात येते. त्या दोघींचा संवाद म्हणजेच ‘देवबाभळी’ हे नाटक आहे. काल्पनिक आख्यायिका अशा स्वरुपात लिहिलेले हे नाटक म्हणजे रंगभूमीवरचा चमत्कारच आहे, असे पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी आपले मत मांडताना सांगितले. प्रकाशक या नात्याने ते यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

देवबाभळी’ या नाटकाचा द्विशतक महोत्सव नुकताच झाला. हेच निमित्त घेऊन दोनशे दोन प्रयोगात ‘संगीत देवबाभळी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या नाटकातील दोन्ही नायिका लाईव्ह संगीतात गाणी गातात. कलाकारांची, वादकांची अचूक वेळ बर्‍याच प्रेक्षकांना ध्वनीमुद्रीत गीत ऐकवतो की काय असा भास होतो. पण त्या रंगमंचावर प्रत्यक्षात गातात याची प्रचिती प्रेक्षकांना यावी यासाठी नाटक संपल्यानंतर श्रेयाच्या साक्षीदारांची ओळख करुन देताना नाटकाच्या नायिका मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते प्रत्यक्ष गाणं सादर करतात. पुन्हा जाताजाता टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट प्रेक्षकांना करावा लागतो इतका सुरेलपणा, अचूकपणा दोघींच्या सादरीकरणात पहायला, ऐकायला मिळतो.

थँक्स् रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशनाच्यावतीने सर्वांत जास्त नाटके पुस्तकरुपाने प्रकाशित केलेली आहेत.जी नाटके प्रेक्षकांना प्रत्येक प्रकाशकाने आपले एक वैशिष्ट्य जपलेले आहे. रामदास भटकळांनी आपल्या अधिक भावतात अशी नाटके भटकळ प्रकाशित करीत असतात. गेल्या चार दशकांत जी काही माईलस्टोन नाटके आली ती बरीचशी नाटके पुस्तकरुपाने भटकळांच्या संग्रही आहेत. जिथे जिथे म्हणून मराठी वस्ती आहे, तिथल्या कलाकारांना जर नाटक करावेसे वाटले तर त्यांना भटकळांचे प्रकाशन हक्काचे वाटलेले आहे. परदेशातूनही नाटकांच्या पुस्तकांसाठी भटकळांशी संपर्क साधला जातो. काही व्यक्तींकडून, संस्थांकडून एकांकिकांची लायब्ररी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कार्यसंचालनालयाच्यावतीने राज्य नाट्य स्पर्धेत जी तीन नाटके विजयी होतात अशा सर्वोत्तम नाटकांचा संग्रह शासन दरबारी आहे. मध्यंतरी अशा निवडकांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -