घरमुंबईनववर्षात भाजपला घरचा आहेर!

नववर्षात भाजपला घरचा आहेर!

Subscribe

२९ गावांसाठी ख्रिस्ती पदाधिकार्‍यांचा पक्षत्याग

वसई-विरार महापालिकेतून २९ गावं वगळण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळल्यामुळे भाजपच्या ख्रिस्ती पदाधिकार्‍यांनी पक्षत्याग केला आहे. सत्तेसाठी भाजपने गावं वगळण्याचे आश्वासन देऊन सत्ताही काबीज केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गावं वगळण्याचे आश्वासन दिले. तरीही गावं वगळण्याचा मुद्दा कायम राहिल्याने वसईतील भाजपच्या ख्रिस्ती पदाधिकार्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रिक्सन तुस्कानो, अल्पसंख्याक अध्यक्ष विजय तुस्कानो, वार्ड अध्यक्ष डेरिक डाबरे, जिल्हा युवा चिटणीस स्टिफन परेरा, आगाशीचे वॉर्ड अध्यक्ष रॉबर्ट लोपीस, विभाग प्रमुख डेव्हिड मच्याडो आणि आल्फँड मच्याडो या पदाधिकार्‍यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. वसई तालुक्यातील अनेक घडामोडी, जडणघडणीत या पदाधिकार्र्‍यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे भाजपला नव्या वर्षात मोठा धक्का बसला आहे.

वसई-विरार महापालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईच्या ग्रामीण भागातील गावांचाही समावेश करण्यात आला होता. या गावांचा समावेश शहरात झाल्यामुळे गावाचे गावपण धोक्यात येईल, नैसर्गिक जंगले नष्ट होऊन सिमेंटचे जंगल उभं राहिलं आणि पर्यावरणाचा र्‍हास होईल, अशा कारणास्तव महापालिकेच्या क्षेत्रातून गावं वगळण्याच्या मुद्यावर जनआंदोलन उभे राहिले होते. तसेच वसईतील काही जणांनी न्यायालयीन लढाही उभारला होता. त्यानंतर गावं वगळण्यासाठी वसई तालुक्यात अनेक आंदोलनं झाली.

- Advertisement -

वसईकर जनतेला पोलिसांचा लाठीमारही सहन करावा लागला. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. त्यामुळे काहींना परदेशी जाण्याची संधीही गमवावी लागली. गावं वगळण्याच्या मुद्यांवर विवेक पंडीत हे आमदार म्हणून निवडून आले. याच मुद्यावर त्यांचा पराभवही झाला. अनेक वसईकर आंदोलक विविध पक्षात सामील झाले तर काहींनी दबाव गटही तयार केला. अनेकांनी वेगळी संघटना काढली तर जुन्या संघटनेने त्यांना काढून टाकले. गेल्या सात-आठ वर्षांत तालुक्यात अनेक घडामोडी घडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -