घरमनोरंजनपाच महिन्यांच्या चिमुरड्याला घरी सोडून दिया मिर्झा गेली कामावर, म्हणाली...

पाच महिन्यांच्या चिमुरड्याला घरी सोडून दिया मिर्झा गेली कामावर, म्हणाली…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने मुलगा अव्यानचा एक फोटो शेअर केला आहे आणि यासोबत दिया मिर्झाने सोशल मीडिया एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अभिनेत्री दिया मिर्झा काही महिन्यांपूर्वी नुकतीच आई झाली. आई बनल्यानंतर दिया मिर्झा बऱ्याचदा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करते. यावेळी तिने असे सांगितले की, कामामुळे मला माझ्या ५ महिन्यांच्या मुलाला घरी सोडून कामावर जावे लागले. मी माझ्या मुलापासून ४ तास दूर होती, पण एवढ्या अंतरावर सुद्धा मला जगणे खूप कठीण वाटले.

दिया मिर्झा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनेत्री अनेकदा चाहत्यांसोबत अनेक पोस्ट शेअर करते. आता अलीकडेच आई बनल्यानंतर दिया मिर्झाने आपल्या मुलाला घरी सोडून कामावर जाण्याचा अनुभव शेअर केला आहे. दिया मिर्झाने सांगितले की, तिला हे करणे खूप कठीण होते.

- Advertisement -

दीयाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘संध्याकाळी बाहेर पडले एका विशेष कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी. आत्तासाठी फक्त या टीमचे आभार मानायचे आहेत. मला भारी वाटले अव्यानपासून २४ तास दूर जाणे खूप कठीण होते.’ दिया मिर्झा आणि वैभव लेखी यांचा मुलगा अव्यानचा जन्म १४ मे रोजी झाला. एनआयसीयूमध्ये चार महिने घालवल्यानंतर अभिनेत्रीने १५ सप्टेंबर रोजी आपल्या मुलाचे घरी स्वागत केले. मुलासोबत तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना दिया मिर्झाने लिहिले, ‘अव्यान तू आम्हाला नम्रता, कृपा आणि प्रार्थनेची शक्ती शिकवली आहे. तू आम्हाला परीपूर्ण केले आहे. आमचे सर्व कुटुंब आणि मित्र तुला पाहून आनंदित झाले आहेत. एनआयसीयूमध्ये तुझी काळजी घेत असलेल्या सर्व पालकांचे, तुम्ही सर्वांचे आभार. सर्व लोकांनी प्रेम, शक्ती आणि प्रार्थना पाठवल्या आहेत. ‘

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -