घरताज्या घडामोडीMega block update : रविवारी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Mega block update : रविवारी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Subscribe

रविवारी २६ सप्टेंबरला देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.

रविवारी २६ सप्टेंबरला देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी ते वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी,वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई,वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. वाशी,बेलापूर,पनवेलला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे,गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल,बेलापूर,वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा सुरु राहील. गोरेगाव,वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

- Advertisement -

तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. मेन लाईन वर दिवा आणि ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर ५व्या आणि ६व्या मार्गासाठी १० तासांचा विशेष ब्लॉक आधीच जाहीर करण्यात आलेला आहे. हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.


हे ही वाचा – कोरोना नियमाचं पालन करून राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -