घरताज्या घडामोडीPadmashri Award: एकता कपूर, करण जोहर लावणार पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी

Padmashri Award: एकता कपूर, करण जोहर लावणार पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी

Subscribe

पद्मश्री पुरस्कार प्रदान सोहळा येत्या ८ नोव्हेंबरला दिल्ली राजभवन येथे पार पडणार

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूरला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. १६ जानेवारी २०२०मध्ये हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा वितरण सोहळा लांबणीवर पडला. पद्मश्री पुरस्कार प्रदान सोहळा येत्या ८ नोव्हेंबरला दिल्ली राजभवन येथे पार पडणार आहे. हा पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीहून खास आमंत्रण देण्यात आले आहे. कलाक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना शासनाचा हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार देण्यात येतो. एकता कूपर सोबत निर्माता करण जोहर,अभिनेत्री कंगना रणौत,ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांना देखील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कलाकारांना

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एकदा कपूर तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत दिल्लीला पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी जाणार आहेत. पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली त्यावेळी एकता कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती त्यात तिने असे म्हटले होते की, मी नम्र आहे अत्यंत भारावून गेलीय. मी वयाच्या १७ व्या वर्षी या क्षेत्रात आले. तेव्हा मी खूप तरुण आणि कच्ची आहे असे मला अनेकांनी सांगितलं होतं. गेल्या काही वर्षात मला एक गोष्ट प्रामुख्याने कळाली की स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप लवकर कधीच नसते आणि खूप तरुण असणे कदाचित चांगली गोष्ट आहे.

Kangana Ranaut’s family gets new guest, see photo
तर अभिनेत्री कंगना रणौतने देखील प्रेक्षकांचे आभार मानले होते. माझ्या या ओळखीसाठी मी माझ्या देशाचे आभार मानते. मी हा पुरस्कार स्वप्न पाहण्याची हिंमत करणाऱ्या प्रत्येक आईला,स्त्रीला,मुलीला आणि आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या प्रत्येक महिलेच्या स्वप्नांसाठी समर्पित करते, असे कंगनाने म्हटले होते.

- Advertisement -


करण जोहर देखील पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर भावूक होत त्याने ट्विटवर लिहिले होते की, मी फार कमी वेळा नि:शब्द होतो. देशातील एका खास पुरस्काराने सन्मानित झाल्याने मी फार भारावून गेलो आहे. नम्र, आनंदी, आणि पाहिलेली स्वप्ने जगण्याची आणि ती स्वप्ने साकारुन मनोरंजन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार असे करणने म्हटले होते.


हेही वाचा – Video : ‘जय भीम’ सिनेमातील सीनमुळे भाषिक वादाला फुटले तोंड, प्रकाश राज होतोय ट्रोल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -