घरमनोरंजनSushant Suicide Case : 'या' ज्येष्ठ चित्रपट समीक्षकाची चौकशी

Sushant Suicide Case : ‘या’ ज्येष्ठ चित्रपट समीक्षकाची चौकशी

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ चित्रपट समिक्षक राजीव मसंद यांची वांद्रे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी दोन पत्रकारांचीही पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवून घेतला होता.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या अंतिम टप्प्यात आहे. सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र या आत्महत्येमागे बॉलीवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे का, याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी सुशांतवर उपचार करणार्‍या तीन मनोचिकित्सकासह एका मानसशास्त्रज्ञाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या चौघांकडे सुशांत हा नियमित ट्रिटमेंटसाठी जात होता. तो प्रचंड नैराश्यात होता, त्याला नेहमीच भीती वाटत होती, त्याचे करिअर संपणार, त्याला कोणीतरी संपवणार आहे, असे वाटत होते. याच दरम्यान सुशांतशी संबंधित काही बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या पत्रकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यापूर्वी दोन पत्रकांराची चौकशी केल्यानंतर मंगळवारी वरिष्ठ चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची वांद्रे पोलिसांनी चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याच प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ४० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -