घरमनोरंजनअभिनेता गजराज रावने केले 'बडे अच्छे लगते हैं 2' च्या प्रोमोजचे दिग्दर्शन

अभिनेता गजराज रावने केले ‘बडे अच्छे लगते हैं 2’ च्या प्रोमोजचे दिग्दर्शन

Subscribe

टेलिव्हिजनवरील अत्यंत गाजलेली मालिका ‘बडे अच्छे लगते हैं 2’ ही एक अत्यंत लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेबद्दल आता प्रेक्षकवर्ग खूप उत्सुक आहे. अलीकडेच या मालिकेचे हृदयस्पर्शी प्रोमो रिलीज झाले, जे प्रेक्षकांना खूपच भावले आहेत. आता हे उघड झाले आहे की, नकुल मेहता आणि दिशा परमार यांना दर्शवणारे, सर्वांना इतके आवडलेले हे प्रोमोज दुसरे तिसरे कोणी नाही, तर गजराज राव या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याने दिग्दर्शित केलेले आहेत.

गंमत म्हणजे नकुल मेहताने या आधी एका चॉकलेटच्या जाहिरातीत गजराज राव यांच्यासोबत काम केलेले आहे. या निमित्ताने नकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर गजराज राव सोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे व त्यात त्याने गजराज राव यांना ‘मोठा अपवाद’ म्हणून संबोधले आहे.

- Advertisement -

‘बडे अच्छे लगते हैं 2’ चे प्रोमोज प्रेक्षकांना भलतेच आवडले आहेत. त्यांना नकुल आणि दिशा यांच्यातील पडद्यावरची केमिस्ट्री खूपच लोभस वाटली आहे. आणि आता या प्रोमोजच्या मागे बॉलीवूड अभिनेता गजराज राव असल्याचे कळल्यानंतर तर प्रोमोजची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे.

इन्स्टाग्रामवर नकुलने त्यांच्यासाठी एक छोटीशी गोड नोट देखील लिहिली. तो लिहितो, “हा असा उद्योग आहे, जिथे तुम्ही एकामागून एक कामे करत राहता, वेळेची बंधने पाळता, येथील कामाच्या स्वरूपामुळे प्रत्येक टप्प्यावर जुळणारी नाती एका सामान्य दिनचर्येचा भाग असतात. गजराजराव मात्र त्याला अपवाद आहेत. सुमारे एक दशकापूर्वी आम्ही दोघांनी एका चॉकलेटच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते त्यानंतर आता माझ्या नव्या टीव्ही मालिकेच्या लॉन्च अभियानासाठी काही प्रोमोजमध्ये मला त्यांचे दिग्दर्शन लाभले.”

- Advertisement -

तो पुढे म्हणतो, “ते तुम्हाला वेळ देतात, तुमच्याशी छान नातं निर्माण करतात, तुमची मानसिकता जाणून घेतात, एक सुंदर कलाकृती आपण कशी निर्माण करू शकतो याबद्दल चर्चा करतात, शूटिंग करताना असेच काही किस्से ऐकवतात (ते फारच छान असतात), तुम्ही नीट जेवला आहात ना, याची विचारपूस करतात, तुमच्या स्टाफपैकी सगळ्यांची नावे जाणून घेतात, त्यांची प्रतिक्रिया देतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात, वेगवेगळ्या शक्यता दाखवतात, आणि मग तुम्हाला एक कलाकार म्हणून पूर्ण मान देऊन अलगदपणे आपले काम काढून घेतात. या गोड स्वभावाबद्दल गजराज सर, तुमचे आभार! तुम्ही विचारपूर्वक दिलेल्या भेटवस्तूबद्दलही आभार. काल रात्रीच मी वाचून संपवले, त्याने मला भरपूर खाद्य पुरवले आहे. मला खूप हुरूप वाटतो आहे. आशा आहे, की पुन्हा लवकरच आपण एकत्र काम करू.”

या गोड नोटला उत्तर देताना गजराज राव यांनी त्या पोस्टवर लिहिले, “तू आणि दिशा परमार यांच्याबरोबर काम करायला खूपच मजा आली. या मालिकेतील तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. भविष्यात अनेक प्रोजेक्ट आपण एकत्र करू हीच आशा!”


Armaan Kohli Arrested: ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -