घरमनोरंजनअहान पांडे 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

अहान पांडे ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

Subscribe

सध्या राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ ची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरूवात झाली आहे. या चित्रपटातून आणखी एका हॉट बॉयची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांचा पुतण्या अहान पांडे ‘मर्दानी २’ निमित्ताने बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

अहान पांडे ‘मर्दानी २’ मध्ये सहय़्यक दिग्दर्शक म्हणून आपली भुमिका बजावणार आहे. राणी मुखर्जीच्या मर्दानी या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अहान पांडे या आधी तीन चित्रपटात दिसणार होता अशी अफवा होती. पण आता मर्दानी २ च्या निमित्ताने आहानचे बॉलिवूड पदार्पणाचं स्वप्न पुर्ण झालं आहे.

 

View this post on Instagram

 

At the end, still at the beginning.

A post shared by Ahaan Panday (@ahaanpandayy) on

- Advertisement -

 या बातम्यांमुळे आहान आला चर्चेत

अहान आणि शहारूख खानची मुलगी सुहाना हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी अहान आणि अभिनेत्री अमायरा दस्तूर यांच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. अहान आणि अमायरा दोघेही पार्टी करायचे, एकत्र फिरायचे. अहानच्या आयुष्यात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर असल्याच्या चर्चा आहेत.

 

View this post on Instagram

 

I only smiled because the photographer was making a funny face

A post shared by Ahaan Panday (@ahaanpandayy) on

- Advertisement -

 सुपरिटेंडेंट ऑफ पोलिसाच्या भूमिकेत

मर्दानीमध्ये राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. राणीने मागच्या ‘मर्दानी’मध्ये सिनिअर इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. ती आता मर्दानीच्या सिक्वीलमध्ये सुपरिटेंडेंट ऑफ पोलिसाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. या चित्रपटात राणी २१ वर्षीय खलनायकाशी सामना करताना दिसणार आहे. ‘मर्दानी २’ ची शूटिंग सुरू झाली असून राणी मुखर्जीला शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत बघणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

राणीने ‘नो वन किल जेसिका’,‘मर्दानी’, ‘हिचकी’अशा दमदार कथानकाच्या जोरोवर तिने अभिनेत्याविनाच हे चित्रपट सुपरहिट करुन दाखवले आहेत. राणीच्या ‘हिचकी’नंतर बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली होती. आता गाजलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सिक्वलदेखील चाहत्यांच्या भेटीस आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -