Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'टायगर 3' चित्रपटातील शाहरुख आणि सलमानचा व्हिडिओ लीक

‘टायगर 3’ चित्रपटातील शाहरुख आणि सलमानचा व्हिडिओ लीक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या सलमान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान सोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. या अॅक्शन आणि रोमाँटिक चित्रपटातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. शिवाय शाहरुख खान देखील या चित्रपटात कॅमियो करणार आहे. अशातच, सलमान आणि शाहरुखचा या चित्रपटाच्या शूटदरम्यानचा एक व्हिडीओ लीक झाला आहे.

शाहरुख आणि सलमानचा व्हिडीओ लीक

सध्या सलमानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. ज्यात शाहरुख देखील कॅमियो करणार आहे. अशातच सोशल मीडियावर त्यांच्या शूटदरम्यानचा एक व्हिडीओ लीक झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neelikhan (@neelikhan786)

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सलमानची एन्ट्री झालेली दिसत आहे. त्यानंतर शाहरुखची देखील एन्ट्री झालेली दिसत आहे. यावेळी बॅकग्राऊंडला पठाण चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ हे गाणं वाजत आहे. या व्हिडीओ पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. चाहते हा व्हिडीओ पाहून अनेक प्रतिक्रिया देखील देत आहेत. एकाने लिहिलंय की, ‘सुपरहिट जोडी’ तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘मी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.’

‘टायगर 3’ या दिवशी होणार प्रदर्शित

सलमान खानने शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये कॅमिओ केला होता, त्यानंतर आता शाहरुख खानही सलमान खानच्या ‘टायगर-3’ मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. शाहरुख खान सध्या कतरिना आणि सलमान खानसोबत त्याच्या काही भागांची शूटिंग करत आहे. ‘टायगर-3’ मध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्याशिवाय इमरान हाश्मीही देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

तो स्वतः ड्राइवर सीटवर बसला… प्रशांत दामलेंनी केलं संकर्षणचं कौतुक

- Advertisment -