घरमनोरंजनहॅरी पॉटर फेम हेलन मक्रॉरी यांचे निधन

हॅरी पॉटर फेम हेलन मक्रॉरी यांचे निधन

Subscribe

हेलेन यांच्या निधनाची बातमी त्यांचे पती डेमियन लेईस यांनी सोशल मीडीयाद्वारे दिली आहे.

हॉलिवूड अभिनेत्री हेलेन मक्रॉरी यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले आहे. हेलेन यांच्या निधनाची बातमी त्यांचे पती डेमियन लेईस यांनी सोशल मीडीयाद्वारे दिली आहे. डेमियन यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘’मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझी पत्नी हेलेनचे निधन झाले आहे. तिने राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजेन की ती आमच्या आयुष्यात होती. हेलेन ही अतिशय सुंदर आणि आत्मविश्वास असलेली व्यक्ती होती. ती आपल्या मित्रमंडळी, कुटुंबातील प्रेमळ व्यक्तींबरोबर होती. ती आज जरी आपल्यात नसली तरी आठवणींच्या रुपाने ती कायम जीवंत असणार आहे. देवाला माहिती आहे की आमचे तिच्यावर किती प्रेम होते. आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की हेलेन आमच्या आयुष्यात आली… हेलेनने अनेक सिनेमांमध्ये उत्कृष्ट आणि कायम लक्षात राहील अशा भूमिका साकारल्या आहेत. हॅरी पॉटरमधील नर्किसा मायलॉफ, जेम्स बॉन्डपट असलेलेया स्काईफॉल चित्रपटात साकारलेली क्लेयर डोवे या तिच्या भूमिका संस्मरणी आहेत….’’ अशा प्रकारची पोस्ट करत डेमियन यांनी हेलेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

हेलेन यांनी ‘ब्लाइंड्स’ या वेब सीरिजमध्ये पोली ग्रे नावाची भूमिका साकारली होती. तसेच २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द क्वीन’सिनेमात त्यांनी माजी ब्रिटिश प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांची पत्नी शेरी ब्लेअर यांची भूमिका साकारली होती. याशिवाय हेलेन यांनी ‘ह्यूगो’, ‘द क्वीन’ आणि ‘द स्पेशल रिलेशनशिप’मध्ये काम केले आहे.


हे वाचा- ‘मोस्टली सेन’ला कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -