घरमनोरंजनहिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार'!

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत ‘सुलतान शंभू सुभेदार’!

Subscribe

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार सत्य घटनेवर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सुलतान शंभू सुभेदार’, हे नाव थोडं अजब वाटतयं ना, हिंदू-मुस्लिम ऐक्याच आणखी एक प्रतिक असल्याच भासवणारं हे नाव एका आगामी मराठी चित्रपटाच आहे. यश असोसिएट मुव्हीज निर्मितीसंस्थेअंतर्गत कैलास गिरोळकर आणि अॅड. प्रशांत भेलांडे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. राज माने यांनी केले आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या नावावरूनच त्याच्या कथेचा अंदाज लावता येईल. चित्रपटात यश गिरोळकर, दिगंबर नाईक, किशोर महाबोले, देवेंद्र दोडके, जयवंत भालेकर, अॅड. प्रशांत भेलांडे, उज्वला गाडे, सिमरन कपूर, सुप्रिया बर्वे, ज्योती निसळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. गीतकार अॅड. प्रशांत भेलांडे यांच्या गाण्यांना धनश्री देशपांडे, डॉ. डहाणे, श्रीरंग भाले यांनी स्वरबद्ध केली असून अरविंद हसबनीस यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे.

सत्य घटनेवर आधारीत कथा

दिग्दर्शक डॉ. राज माने सांगतात की, ‘सुलतान शंभू सुभेदार’ या सिनेमाचे कथानक एका सत्य घटनेवर बेतलेले आहे. त्याला कल्पनेची जोड देत अॅड. प्रशांत भेलांडे यांनी कथा गुंफली आहे. ही कथा एका मुस्लीम कुटुंबातील हरवलेल्या सुलतानची आहे. ज्याचे पालन एक हिंदू रिक्षाचालक शंभू सुभेदार करतो. आयुष्याच्या एका वळणावर या दोघांची भेट होते आणि तिथूनच शंभूचे विश्व बदलून जाते. दोघांच्या नात्यात जिव्हाळा आणि प्रेम झाल्याने दोघे आनंदाने जगत असतात. आता शंभूच्या आयुष्यात सुलतानशिवाय दुसरं कुणीही नाही. त्याला लहानाचे मोठे करण्यात, शिकवण्यात शंभू आपले सर्व जीवन व्यतीत करतो. परंतू एक क्षण असा येतो की तिथे सुलतानचे जन्मदाते उभे ठाकतात. पुढे सुलतानचे काय होते? तो जन्मदात्या अम्मी–अब्बूकडे जातो की शंभूकडे राहतो हे पाहण औस्तुक्याचं ठरणार आहे.

- Advertisement -

सामाजिक बांधिलकी जपणारा विषय

अमरावतीचे निर्माते कैलास गिरोळकर यांनी अशा विषयाचा सिनेमा करण्याचे धाडस केल्याचे दिग्दर्शकाने म्हटले आहे. गल्लाभरू आणि आचरट विनोदी सिनेमा करण्याला बगल देत सामाजिक बांधिलकी जपत असा एक संवेदनशील विषय हाताळणे खरोखर धाडसाचे काम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -