घरताज्या घडामोडीसलमानच्या 'राधे' चित्रपटाला हॉलिवूडचा 'फास्ट अँड फ्युरिअस' ९ देणार टक्कर

सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाला हॉलिवूडचा ‘फास्ट अँड फ्युरिअस’ ९ देणार टक्कर

Subscribe

सलमान खानचा राधे, अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब आणि हॉलिवूड फिल्म फास्ट अँड फ्यूरियस ९ हे तिन्ही चित्रपट २२ मे रोजी ईदच्या दिवशी एकाच वेळी बॉक्स ऑफिसवर धडक देणार आहेत.

स्पीड, अॅक्शन, शानदार गाड्या आणि जबरदस्त स्टारकास्टमुळे ‘फास्ट अँड फ्युरियस’ सिनेमाचे पहिले आठ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. आता ‘फास्ट अँड फ्युरियस’ च्या पुढील बहुप्रतिक्षित नवव्या भागाचा ट्रेलर शनिवारी सकाळी प्रदर्शित झाला आणि काही तासातच ट्रेलरला 9,381,543 इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची काही आकर्षक पोस्टर्स शेअर केली आहेत. त्यानंतर, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही तयारीत आहोत. तसेच, चित्रपट २२ मे म्हणजेच ईदच्या दिवशी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

- Advertisement -

एकाच दिवशी तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर धडक

मात्र २२ मे २०२० या एकाच दिवशी सलमान खानचा राधे, अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब आणि हॉलिवूड फिल्म फास्ट अँड फ्यूरियस ९ हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. सलमान खानचा ”राधे” चित्रपट हॉलिवूडचा ”फास्ट अँड फ्युरिअस” ९ टक्कर देणार का? असा प्रश्न यावेळी पडतोय. फास्ट अँड फ्युरियस या सिनेमात कार्डी बीची एका नविन पात्राची भूमिका करणार आहे. ख्रिस ल्युडाक्रिस ब्रिज, जोर्डाना ब्रूस्टर, नॅथली इमॅन्युएल आणि सुंग कांग यांच्यासह ऑस्कर विजेत्या हेलेन मिरेन आणि चार्लीज थेरॉन हे कलाकार दिसणार आहेत.

- Advertisement -

सलमानचा राधे चित्रपटातून हटके अंदाज –

सलमान खानचा राधे हा चित्रपटदेखील २२ मे रोजी प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केेले आहे. तसेच, या चित्रपटामध्ये दिशा पटानी, रणदिप होडा, जॅकी श्रॉफ, तमिळ अभिनेता भारथ, गायक अर्जुन कानुंगो आणि एका खास डान्समध्ये जॅकलिन फर्नांडिजचीही भूमिका असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -