घरमनोरंजनहुमा कुरेशीच्या आता नेटफिल्कसवर 'लीला'

हुमा कुरेशीच्या आता नेटफिल्कसवर ‘लीला’

Subscribe

अभिनेत्री हुमा कुरेशी लवकरच वेबसिरीजच्या जगतात प्रवेश करत आहे. 'लीला' या नेटफ्लिक्सच्या नवीन वेबसिरीजमध्ये हुमा मधवर्ती भुमिकेत आहे.

हुमा कुरेशी आणि सिध्दार्थ अशी तगडी स्टार कास्ट असलेला लीला या वेबसिरीजमधून पहिल्यांदा नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. १४ जूनला ‘लीला’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रयाग अकबर यांच्या पुस्तकावर आधारीत लैला या वेबसिरीजचे दिग्दर्शन दिपा मेहता, शंकर रमण आणि पवन कुमार यांनी केले आहे.

अशी असेल ‘लीला’

- Advertisement -

एकूण सहा भागांची ही मालिका आहे. हुमा आणि सिध्दार्थबरोबर राहूल खन्ना,संजय सूरी आणि आरिफ जकारीया यांच्याही भुमिका आहेत. आपल्या लीला नावाच्या हरवलेल्या मुलीला शोधण्यासाठी धडपडणाऱ्या आईची ही गोष्ट आहे. लीलाच्या आईचं म्हणजेच शालीनीच काम हुमा साकारणार आहे. लीला ला शोधताना शालीनीला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं हे तुम्हाला सहा भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

लीला हा नेटफ्लिक्सचा सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट आहे. शालिनी हे पात्र स्त्रीची ताकद, आशावाद याचं अनोखं मिश्रण आहे. हे अनोखं मिश्रणचं तीला सगळ्या अडथळ्यातून बाहेर पडालयला मदत करतं. शालिनीचं पात्रं साकारताना मलाही त्यातून कलाकार म्हणून खूप शिकता आलं. मला खात्री आहे ही वेबसिरीज बघणारे नक्की यातून नक्की काहीतरी शिकतील, अशी भावना लीला विषयी बोलताना हिमा कुरेशीने व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

Finally a picture with the talented Mr Sid @worldofsiddharth #costar #Leila #Shanu #shoot

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq) on

तर सिध्दार्थ लीला विषयी बोलताना म्हणाला, मी या वेबलिरीजमध्ये भानू नावाचं कॅरेक्टर करतोय. भानूचा प्रवास हा खूप सुखकर आहे. आमची संपूर्ण टीमच खूप स्ट्रॉग आहे. त्यामुळे भानू साकारणं खूप कठीण गेलं नाही. आता प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रीया येतात हे बघायला मी उत्सुक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -