किंग खानच्या वेबसिरीजमध्ये झळकणार ‘हा’ मराठी अभिनेता!

२४ मे ला बेताल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानने या वेबसिरीजची निर्मीती केली आहे.

shaharukh khan
शहारूख खान

‘सरताज साहेबांचा फोन आहे’, असं म्हणत आपल्या पत्नीलाही डावलणारा ‘हवालदार काटेकर’ प्रेक्षकांना भलताच आवडलेला होता. ‘नेटफ्लिक्स इंडिया’ची पहिली ओरिजिनल वेब सीरिज . ‘सेक्रेड गेम्स’च्या माध्यमातून ‘काटेकर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पुन्हा एकदा काटेकर म्हणजेच जितेंद्र जोशी नव्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र जोशीने याबद्दलची माहिती दिली.

जितेंद्रची ही वेबसिरीज देखील नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित होणार आहे.  ‘बेताल’ असं या वेबसीरिजचं नाव आहे. जितेंद्रने सोशल मीडियावर त्या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही सेकंदाचा असणाऱ्या या व्हिडिओत जवानाच्या गणवेशातील एक व्यक्ती आहे आणि त्याच्यामागे दोन व्यक्ती उभ्या आहेत. जितेंद्रने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे वेबसिरीजविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

२४ मे ला बेताल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानने या वेबसिरीजची निर्मीती केली आहे. शाहरुखच्या ‘रेड चिलीज एन्टरटेन्मेंट’ने या सीरिजची निर्मिती केली आहे.


हे ही वाचा – भारत -तिबेट सीमेवरील ४५ जवानांना कोरोनाची लागण!