घरताज्या घडामोडीकंगना पोहचली सेलल्यूलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन

कंगना पोहचली सेलल्यूलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन

Subscribe

कंगना राणौतने अंदमान निकोबार येथे असलेल्या सेल्युलर जेलला दिली भेट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने अंदमान निकोबार येथे असलेल्या सेल्युलर जेलला भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती ते ठिकाण म्हणजे सेलेल्युरल जेल. अभिनेत्री कंगनाने नुकतीच सेलल्युलर जेलला भेट देत सावकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले आहे. कंगनाने तिच्या इस्टाग्रामवरुन तिथले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत कंगनाने त्याखाली एक कॅप्शन देखील दिले आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

कंगनाने सेलल्युलर जेलमधील फोटो शेअर करत लिहिले आहे की, आज अंदमान निकोबार येथे असलेल्या वीर सावरकर कक्षेचा दौरा केला. सावरकरांची कक्षा पाहून मी पार हलले. जेव्हा अमानुषता शिगेला पोहचली होती तेव्हा सावरकरांनी माणूसकी जगवली. त्यांनी प्रत्येक क्रूरतेचा विरोधा केला आणि दृढ संकल्पासोबत त्याचा सामना केला. ते किती घाबरले असतील ज्यांच्यामुळे त्यांनी सावरकरांना त्या काळात काळ्या पाण्यात ठेवले होते’

कंगनाने पुढे असे म्हटले आहे की, समुद्राच्या मधोमध अशा छोट्या लक्षद्वीपमधून वाचणे असंभव आहे. तरी देखील इंग्रजांनी वीर सावरकरांच्या हातात बेड्या घातल्या होत्या. एक उंच भिंत असलेले जेल तयार केले आणि त्यांना एका छोट्या कोठडीत बंद केले. यावरुन लक्षात येते की इंग्रज किती भ्याड होते. आपण पुस्तकात वाचलेले स्वातंत्र्य सत्य नाही तर हे जेल स्वातंत्र्याचे खरे सत्य आहे. भारताच्या स्वातंत्र संग्रामातील खऱ्या नायकाला माझे कोटी कोटी प्रणाम असे कंगनाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आर्यनचा जामीन शाहरुख खानला वाटतोय कठीण, मन्नतवरील स्थिती मित्राकडून शेअर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -