घरमनोरंजनकपिल शर्माच्या पंजाबी चित्रपटाचा फर्स्ट लुक

कपिल शर्माच्या पंजाबी चित्रपटाचा फर्स्ट लुक

Subscribe

कॉमेडी किंग कपिल शर्माने सोशल मीडियावर त्याची निर्मिती असलेला पंजाबी सिनेमा 'सन ऑफ मनजीत सिंग' चा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याचा नवीन शो घेऊन लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. मात्र त्यापूर्वी चर्चा आहे ती त्याच्या आगामी चित्रपटाची. या चित्रपटात कपिल अभिनयाच्या नाही तर निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. गेले कित्येक दिवस लाईमलाईटपासून दूर राहिलेल्या कपिल शर्माने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून धमाकेदार सुरूवात केली आहे. कपिलने त्याच्या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केले आहे. कपिलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पंजाबी चित्रपट ‘सन ऑफ मनजीत सिंग’ चे पोस्टर शेअर केले आहे.

- Advertisement -

निर्मात्याच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला 

कपिल शर्माने इंस्टाग्रामवर पंजाबी कलाकार गुरप्रीत घुग्गी अभिनीत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम ग्रोवर यांनी केले आहे. सन ऑफ मनजीत सिंग हा सिनेमा १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कपिल शर्मा आणि सुमीत सिंग एकत्रीतपणे करणार आहेत. तर कपिलचा आगामी शोदेखील ऑक्टोबरमध्येच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. त्यामुळे कपिलसाठी डबल आनंदाचा क्षण आहे.

कपिलच्या शोचेही पुनरागमन 

विनोदवीर कपिल शर्मा हा बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरून गायब झाला आहे. सोनी वाहिनीवर ‘दि फॅमिली नाइट्स विथ कपिल’ हा त्याने शेवटचा शो केला होता. हा शो केवळ तीन एपिसोडच दाखवला गेला. त्यानंतर कपिल आजारी असल्याने उपचार घेण्यासाठी शो बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून कपिल शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये स्लिम-ट्रिम असणारा कपिल सुजलेला आणि जाडजुड दिसत आहे. त्यामुळे कपिलने त्याच्या फिटनेसकडे थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष केल्याचे समजते. मात्र आता नवीन शो घेऊन येताना कपिल कोणत्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -