घरक्रीडाWTC Final : टेस्टच्या अखेरच्या दिवशी टेंशन वाढल्याने न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू राहिला...

WTC Final : टेस्टच्या अखेरच्या दिवशी टेंशन वाढल्याने न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू राहिला बाथरूममध्ये लपून

Subscribe

चौथ्या डावात जिंकण्यासाठी भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने आठ विकेट राखून गाठले होते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना काही दिवसांपूर्वीच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारत अजिंक्यपदाची गदा आणि साधारण १२ कोटी रुपये आपल्या नावे केले. या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांत पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. परंतु, पाचव्या आणि सहाव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने पूर्ण दिवसाचा खेळ झाला व न्यूझीलंडने दर्जेदार खेळ करत हा अंतिम सामना जिंकला. चौथ्या डावात जिंकण्यासाठी भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने आठ विकेट राखून गाठले. मात्र, या सामन्याच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करत असताना वेगवान गोलंदाज कायेल जेमिसनला खूप टेंशन आले होते. त्यामुळे तो बाथरूममध्ये लपून राहिला होता.

भारतीय चाहत्यांना जल्लोष ऐकू येत होता

सामना पाहण्याच्या बाबतीत बोलायचे, तर तो बहुधा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण काळ होता. आम्ही सर्व जण ड्रेसिंग रूममध्ये बसून सामना टीव्हीवर पाहत होतो. प्रत्यक्ष सामन्यापेक्षा टीव्हीवर सामना काही सेकंदांनंतर दिसतो. ड्रेसिंग रूममध्ये आम्हाला भारतीय चाहत्यांना जल्लोष ऐकू येत होता. त्यामुळे आम्हाला वाटायचे की आमचा एखादा फलंदाज बाद झाला. मात्र, आमच्या फलंदाजाने केवळ धाव काढली किंवा चेंडू निर्धाव गेला, तरी भारतीय चाहते जल्लोष करत होते, असे जेमिसन म्हणाला.

- Advertisement -

सामना पाहणे फार अवघड झाले होते

ड्रेसिंग रूममध्ये बसून सामना पाहणे फार अवघड झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवाजापासून दूर जाण्यासाठी मी अधूनमधून बाथरूममध्ये लपून बसायचो. मला फार टेंशन आले होते. मात्र, केन विल्यमसन आणि रॉस टेलर या आमच्या प्रमुख फलंदाजांनी संयम राखून खेळ करत आम्हाला सामना जिंकवून दिला, असेही जेमिसनने सांगितले. जेमिसनने अंतिम सामन्यात दोन डावांत मिळून ७ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -