घरताज्या घडामोडीKatrina-vicky Kaushal Wedding: लग्नाचा ७५ टक्के खर्च कतरिनाच्या डोक्यावर, एकटीच घेतेय सगळे...

Katrina-vicky Kaushal Wedding: लग्नाचा ७५ टक्के खर्च कतरिनाच्या डोक्यावर, एकटीच घेतेय सगळे निर्णय

Subscribe

ट्रॅव्हलिंग,पाहुणे,सिक्युरिटी अरेंजमेंट्स, कॅटरिंग सगळ काही कतरिना पाहत आहे

संपूर्ण बॉलिवूड ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज आला. बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणजेच कतरिना कैफ आणि विक्की कौशल आज लग्न करत आहेत. या लव्ह बर्ड्सनी राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये शाही विवाह सोहळा आयोजित केला आहे. वेडिंग वेन्यूपासून आउटफिट,डेकोरेशन,वेडिंग कार्डपर्यंत सगळ्या रॉयल गोष्टी यांच्या लग्नात पाहता येणार आहे. दोघांच्या लग्नासंदर्भात अनेक गोष्टी सातत्याने समोर येत आहेत त्यातीलच एक गोष्ट म्हणजे विक्की आणि कतरिनाच्या लग्नाचा जवळपास ७५ टक्के खर्च हा एकट्या कतरिनाने उचलला आहे. आता असं का याच कारण काही अद्याप समोर आलेलं नाही.

मीडिया रिपोर्टनुसार विक्की कतरिनाच्या लग्नाचा ७५ टक्के खर्च कतरिना करते आहेच त्याचप्रमाणे लग्नातील सगळे महत्त्वाचे निर्णय देखील कतरिना एकहानी घेत असल्याचे सांगितले जात आहे. कतरिना लग्नात होणारा खर्च हा जास्त करुन चेकच्या स्वरुपात करत आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग,पाहुणे,सिक्युरिटी अरेंजमेंट्स, कॅटरिंग सगळ काही कतरिना पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

विक्की कौशल लग्नाचा केवळ २५ टक्के खर्च पाहत आहे. लग्नातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा कतरिना घेत आहे. दोघांच्या लग्नातील मीडिया कव्हरेजवर बॅन, हाय सिक्युरिटी,लग्नाच मोबाइलवर बंदी यासारखे महत्त्वाचे निर्णय हे कतरिनाने घेतले आहेत. असं म्हटले जात आहे की, या लग्नावर विक्की कौशल फारसा खुश नाहीये. विक्कीला लग्नाचा वेन्यू जास्त आवडलेला नाही. परंतु कतरिनाचे मन मोडू नये म्हणून त्याने लग्नासाठी हो म्हटले.


हेही वाचा – Vicky-Katrina Wedding: विक्की-कॅटच्या लग्नाबाबत कंडोम कंपनीची पर्सनल कमेंट; युजर म्हणाले, ओ भाई….

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -