घरमनोरंजन'केबीसी १०' चा ग्रँड फिनाले; कपिल शर्मा लावणार हजेरी!

‘केबीसी १०’ चा ग्रँड फिनाले; कपिल शर्मा लावणार हजेरी!

Subscribe

कौन बनेगा करोडपतीचा १० वा सीजन संपणार असून त्याचा ग्रँड फिनाले आज दाखवला जाणार आहे. या खास एपिसोडमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा हजेरी लावणार आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम आता संपुष्टात येत आहे. सध्या केबीसीचा १० वा सीजन सोनी वाहिनीवर दाखवला जात असून शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी त्याचा ग्रँड फिनाले आहे. सप्टेंबर महिन्यात यंदाच्या सीजनला सुरुवात झाली असून अवघ्या तीन महिन्यात केबीसीचे दहावे पर्व संपणार आहे. यामुळे छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांना मात्र निराशा होणार आहे. याबाबतची माहिती केबीसीचे होस्ट आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. आज रात्री ९.३० वाजता केबीसीचा ग्रँड फिनाले दाखवला जाणार असून या खास कार्यक्रमात कॉमेडियन कपिल शर्मा हजेरी लावणार आहे.

- Advertisement -

करमवीर ठरले शोचे खास आकर्षण

रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ चा १० वा सीजन ३ सप्टेंबर रोजी छोट्या पडद्यावर दाखल झाला होता. यंदाही नवनवीच उपक्रम या शोमध्ये राबवले गेले. केबीसीने करमवीर हा खास शो यंदाच्या सीजनमध्ये दाखवला. यावेळी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना शोमध्ये आमंत्रित करून त्यांच्या संस्थेसाठी मदतकार्य म्हणून केबीसीचा खेळ खेळवला जात असे. हा खास एपिसोड दर शुक्रवारी दाखवला जायचा. २००० साली सुरु झालेला केबीसीचा प्रवास तब्बल १८ वर्ष सुरु आहे. यंदाच्या सीजनमध्ये ७१६ एपिसोड दाखवण्यात आले असून यासाठी बिग बींनी यासाठी एका एपिसोडकरता ३ ते ४ तास जास्तीचे शूटींग केले आहे.

वाचा : केबीसीचे स्पर्धक मलाही प्रेरीत करतात – अमिताभ बच्चन

- Advertisement -

वाचा : अमिताभ बच्चन यांनी फेडले उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज

वाचा : पुन्हा ‘कौन बनेगा करोडपती’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -