घरमहाराष्ट्र११ वर्षाच्या चिमुरड्यानी घेतला गळफास

११ वर्षाच्या चिमुरड्यानी घेतला गळफास

Subscribe

औरंगाबादमध्ये एका चौथीच्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुरड्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टीव्हीवरच्या सिनेमातील दृष्य पाहून चिमुरड्याने हे कृत्य केल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.

चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरड्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. विकास मच्छिंद्र पवार (११) असे या मुलाचे नाव आहे. या चिमुरड्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या चिमुरड्यांनी आत्महत्या का केली असावी असता प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विकासने हा प्रकार टी. व्ही. वर सुरु असलेल्या सिनेमातील दृष्य पाहून त्याचे या चिमुरड्याने अनुकरण केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


वाचा – आर्थिक विवंचनेतून वडिलांची आत्महत्या

- Advertisement -

नेमके काय घडले?

औरंगाबादमधील वाळुज – सिडको महानगरातील विकास पवार (११) या चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याचे आई – वडील औद्योगिक वसाहतीतील नायलॉन कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई त्या शेजारच्याच एका कंपनीत नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आई-वडील दोघे ही कामावर निघून गेले. तर त्याच्या दोन्ही वहीणी देखील शाळेत गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार विकास पवार हा घरात एकटाच टी.व्ही पाहत बसला होतो. सायंकाळ झाल्यानंतर विकासच्या बहिणी घरी आल्यानंतर त्यांना विकास छताला लटकताना दिसला. त्यांना आपला भाऊ मजामस्ती करत असलायचे वाटल्याने त्या बहिणींने त्या गळ्यातील ओढणी खेचली. ओढणी खेचल्यानंतर विकास खाली कोसळला. या बहिणींनी विकासला हलवले मात्र त्याची हालचाल न झाल्याने त्यांनी अखेर शेजाऱ्यांची मदत घेतली आणि आई-वडीलांना फोन केला. त्यानंतर विकासला उपचारासाठी घाटीत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी विकासला तपासून मृत घोषित केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिसांनी मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.


वाचा – बेरोजगारीला कंटाळून चार तरुणांनी केली आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -