‘केजीएफ’च्या पहिल्या चॅप्टरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे प्रेक्षक ‘केजीएफ चॅप्टर २’च्या प्रतिक्षेत होते. आता ‘केजीएफ चॅप्टर २’नं धडाकेबाज एंट्री केली आहे. प्रदर्शित होताच चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. आरआरआरनंतर आता ‘केजीएफ चॅप्टर २’नं प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. ‘केजीएफ’ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात शानदार कमाई केली होती. दरम्यान आरआरआर चित्रपटाचे बजेट ५५० कोटी होते तर ‘केजीएफ चॅप्टर २’चे बजेट दीडशे कोटी आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच ‘सोने पर सुहाना’ या हिंदीतील म्हणी प्रमाणं झालं आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’नं पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा गल्ला कमावला आहे.
‘केजीएफ चॅप्टर २’ धमाकेदार सुरुवात
दाक्षिणात्य अभिनेता यश, बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन अभिनीत असलेला ‘केजीएफ चॅप्टर २’ काल प्रदर्शित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष चित्रपट किती कमावतो? यावर आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’नं पहिल्याच दिवशी १५० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. कन्नडमध्ये ३५ कोटी, तामिळमध्ये १२ कोटी, केरळमध्ये ७.५० कोटी, ऑनलाईनहून ५२ कोटी रुपये असं एकूण मिळून ‘केजीएफ चॅप्टर २’नं पहिल्याच दिवशी १५० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.
वीकेंड होणार धमाल
‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट हा सुट्ट्याच्या दरम्यान प्रदर्शित झाला आहे. गुड फ्रायडे, बैसाखी आणि वीकेंड यामुळे सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. याचा फायदा ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाला होणार आहे. सध्या ‘केजीएफ चॅप्टर २’ जोरदार चर्चा सुरू आहे, काही जणांचे चित्रपट पाहिल्यानंतरचे रडतानाचे व्हिडिओ, मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच ‘केजीएफ चॅप्टर ३’ची चर्चाही रंगली आहे.
Summary of 2022 till now!!#Pushpa #RRR #KGF2 #KGFChapter2 #KGF3 #KGFChapter2review #KGF2InCinemas #Yash #PrashanthNeel pic.twitter.com/f1b52WW87w
— RONITH SACHIN 🇮🇳 (@ronithsachin) April 15, 2022
CEO?
For which company
Audience – KGF?
Rocky – INDIA 🇮🇳Audience – Clap, Laugh, Shout 😎 #YashBOSS𓃵 #KGFChapter2 #KGF3 pic.twitter.com/yyYQuJnTX2
— KAMIL – #DCTRINITY #SONOFKRYPTON (@DcTrinity3) April 15, 2022
Emotions & Elevations are the heart of #KGFChapter2 ❤️🤩 Thank you Telugu audience for accepting it with great love❤️❤️🤩 #KGF2InCinemas pic.twitter.com/ADbJ7GQa3A
— KGF2 IN CINEMAS NOW (@FilmsCricket) April 14, 2022
हेही वाचा – अखेर रणबीर-आलिया अडकले विवाह बंधनात, पहिला फोटो समोर