घरक्रीडाIPL ने बदललं आयुष्य! Abhinav Manoharला गुजरात टायटन्सने बनवले करोडपती, वडिलांचं होतं...

IPL ने बदललं आयुष्य! Abhinav Manoharला गुजरात टायटन्सने बनवले करोडपती, वडिलांचं होतं चपलांचं दुकान

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामातील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळण्यात आला. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला. यावेळी गुजरातच्या संघाने राजस्थानला १९३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान पूर्ण करण्यासाठी गुजरातचा नवखा क्रिकेटर अभिनव मनोहर याचे मोलाचे योगदान ठरले आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीने अभिनवने चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे आणि फलंदाजीमुळे क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आलं.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्सविरूद्ध अभिनवने २८ चेंडूत ४३ धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि दोन षट्कारांचा समावेश होता. त्याने हार्दिक पांड्यासोबत मोठी भागीदारी केली. परंतु त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. अभिनवला राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने बाद केले.

अभिनव मनोहरची कामगिरी काय?

अभिनव मनोहर कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नुकत्याच झालेल्या हंगामात या २७ वर्षीय क्रिकेटपटूने पदार्पण केले. अभिनवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१-२२ मधील कामगिरीने प्रभावित केले. त्याला बाद फेरीत कर्नाटकने संधी दिली आणि त्याने संधीचे सोने केले. प्री-क्वार्टर फायनलमध्ये सौराष्ट्रविरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याने ४९ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या.

- Advertisement -

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता गुजरातला या खेळाडूला विकत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली. मेगा लिलावात अभिनव २० लाखांच्या मूळ किंमतीत उतरला होता. गुजरातने मूळ किंमतीच्या १३ पटीने जास्त म्हणजे २ कोटी ६० लाखांना त्याला विकत घेतले.

वडिलांचं होतं चपलांचं दुकान

अभिनव मनोहर मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे त्याचे वडील बंगळुरूमध्ये फुटवेअरचे दुकान चालवत होते. ज्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. अभिनवला लहानपणापासूनच क्रिकेटची फार आवड होती. त्यामुळे त्याने अनेक अडचणींवर मात करत क्रिकेटची आवड जोपासली.


हेही वाचा : Good Friday 2022 : गुड फ्रायडेची परंपरा आणि या दिवसाचं महत्व काय?, का साजरा केला जातो हा दिवस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -