घरमनोरंजनआगामी 'तानाजी' साठी अजयने जाणून घेतला मराठा इतिहास

आगामी ‘तानाजी’ साठी अजयने जाणून घेतला मराठा इतिहास

Subscribe

'आगामी ‘तानाजी’ चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत असताना मराठी इतिहासाबद्दल बरेच काही जाणून घेता आले'

अजय देवगणचा बिग बजेट चित्रपट तानाजी असणाऱ्या तानाजी या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजने केली आहे. इतिहासाशी संबंधित असणाऱ्या या चित्रपटाच्या कथेसाठी भूषण कुमारने अजय देवगणला कास्ट केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग २५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २०१९ च्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो. लवकरच अजय देवगण याची अधिकृत घोषणा करणार आहेत. आपल्या आगामी ‘तानाजी’ चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत असताना मराठी इतिहासाबद्दल बरेच काही जाणून घेता आल्याचे बॉलिवूडचा अभिनेचा अजय देवगण याने सांगितले.


अजयच्या ‘तानाजी’ करिता ‘हा’ व्हिलन चेहरा बनणार मावळा

अजयने ट्विटरवर प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आणि या व्हिडिओसह त्यांनी लिहिले की, “तानाजी” ची तयारी करताना मला मराठा इतिहासाबद्दल बरेच जाणून घेऊन शिकण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

या चित्रपटात अजय देवगणसोबत काजोल आणि सैफ अली खानदेखील दिसणार आहेत. या चित्रपटात काजोल अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असू शकतो. हा अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -