घरCORONA UPDATECorona : हा व्हायरस कुणालाही सोडत नाही - लता मंगेशकर

Corona : हा व्हायरस कुणालाही सोडत नाही – लता मंगेशकर

Subscribe

बॉलीवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब म्हणजेच बच्चन परिवारातील बहुतांश सर्वांनाचा कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सिनेजगतासह संपूर्ण देशातून चिंता व्यक्त होत आहे. ज्येष्ठ कलाकार (amitabh bachchan) अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या सर्वांनाच (covid 19)  कोरोनाची लागण झाली असून ते सध्या मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याची माहिती मिळताच गानसम्राज्ञी (lata mangeshkar) लता मंगेशकर यांनी मात्र प्रतिक्रिया देताना यावर विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे.

जया बच्चन यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण बच्चन कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याने लता मंगेशकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विश्वास बसत नाही बच्चन कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी (bollywood) बॉलीवूड हंगामा या सिने वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले की, अस वाटतंय जस कोणी चेहऱ्यावर झापड मारली आहे. हा व्हायरल कोणालाही सोडणार नाही. आपल्याला या व्हायरसपासून वाचायचे असेल तर घरातच बसावे लागेल. आठ वर्षाच्या आराध्यालाही कोरोना झाला असून लता मंगेशकर यांनी तिच्यासाठी जास्त काळजी वाटत असल्याचे म्हटले आहे. आराध्या अजून खुपच लहान आहे. तिला असा त्रास होऊ नये. मी संपूर्ण बच्चन कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहे. खास करून आराध्यासाठी. मला विश्वास आहे की ते सगळे लवकरच बरे होतील.

- Advertisement -

गेल्या शनिवारी रात्री अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर लगेचच मुलगा अभिषेक बच्चन हादेखील कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले. तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या बच्चन आणि मुलगी आराध्या यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सुरूवातीला अमिताभ आणि अभिषेक बच्चन हे दोघेच नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र शुक्रवारी ऐश्वर्या आणि आराध्यादेखील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Police Recruitment: १२,५३८ पोलीस पदांची भरती; ५ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -