घरताज्या घडामोडीMaya Govind Passes Away: लोकप्रिय गीतकार माया गोविंद यांचं निधन, ३५० चित्रपटासाठी...

Maya Govind Passes Away: लोकप्रिय गीतकार माया गोविंद यांचं निधन, ३५० चित्रपटासाठी लिहिली होती गाणी

Subscribe

लोकप्रिय कवयित्री, लेखिका आणि ३५०हून अधिक हिंदी चित्रपटासाठी गाणी लिहिणाऱ्या गीतकार माया गोविंद यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ८० वर्षीय माया गोविंद यांची तब्येत ठीक नव्हती. २० जानेवारीला माया गोविंद यांना ब्रेन ब्लड क्लॉटिंगमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर २६ जानेवारीला रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. माया गोविंद यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

माया गोविंद यांचे पुत्र अजय गोविंद एबीपी न्यूजसोबत यांनी बोलताना सांगितलं होत की, ‘पहिल्यांदा लंग इंफेक्शन आणि त्यानंतर ब्रेन ब्लड क्लॉटिंगमुळे त्यांना मुंबईतील जुहूतील आरोग्य निधि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारात निष्काळजीपणा होत होता आणि त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर घरीच उपचार सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती.’

- Advertisement -

माया गोविंद यांनी ८० दशकात टीव्ही सीरियल आणि चित्रपटसृष्टीत ३५० हून अधिक चित्रपट आणि म्युझिक अल्बमसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होत. आज त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा झटका लागला आहे.

दरम्यान माया गोविंद यांचा जन्म १९४०मध्ये लखनऊ येथे झाला होता. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात गीतकार म्हणून केली. त्यांनी ‘सौतेला’, ‘रजिया सुल्तान’, ‘बाल ब्रह्मचारी’, ‘आर या पार’, ‘गर्व’, अक्षय कुमारचा ‘मैं खिलाडी अनाडी’, अमिताभ बच्चन यांचा ‘लाल बादशाह’ आणि ‘याराना’ सारख्या ३५० चित्रपटातील गाणी लिहिली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुस्लिम राष्ट्रात लाऊडस्पीकरवर अजान नाही तर भारतात का?, अनुराधा पौडवालांचा सवाल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -