घरमनोरंजनकलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; आणि तुम्ही?

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; आणि तुम्ही?

Subscribe

सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. पण दरवेळी प्रमाणे या मतदानादिवशीही कलाकारांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे बॉलिवूडकरांनीही मतदानाचा हक्क बजावला. आपल्या मतदान केल्याचा फोटो सोशलमिडीयावर पोस्ट करत नागरिकांनाही घरातून बाहेर पडत मतदान करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गितांजली कुलकर्णी या दाम्पत्याने देखील गोरेगाव मतदार केंद्रावर मतदान केले आहे. ‘मतदान करताना आपण मतदानाच्या दिवशी किंवा पंधरा दिवस अगोदर कुणाला मतदान करायचं? हा विचार करतो पण हे बरोबर नाही. पाच वर्ष आपण यावर समग्र विचार करायला हवा,’ असं अतुल कुलकर्णी यांने सांगितले. यावेळी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदान केलं आहे. तसेच अभिनेता प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे मतदान केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मतदान हा 5 वर्षांनी असणार सण आहे. त्यामुळे तो उत्साहात साजरा केला पाहिजे. संध्याकाळी पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे लवकरच मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच प्रशांत दामले यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक देखील केले आहे. राजेश शृंगारपुरे यांनी देखील मतदान करून आपला हक्क बजावला आहे.

- Advertisement -

तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने देखील फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका, विचारपूर्वक मत द्या, अत्यंत गरजेचं आहे. धर्म, जात या विषयावर विचार न करता वैक्तिक उमेदवारांचे शिक्षण आणि कार्यक्षमता आहे का, त्याचा विचार करा, असे आवाहन केले. त्याचबरोबर गायिका आर्या आंबेकर,सलील कुलकर्णी, नाना पाटेकर,प्रविण तरडे,अवधूत गुप्ते, सुनील बर्वे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

मराठी चित्रपट सृष्टीप्रमाणेच बॉलिवूडकरांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांनी मतदान केले तर बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानने देखील मतदानाचा हक्क बजावला. तर अभिनेत्री करिना कपूर लाडक्या तैमुरला घेऊन मतदान केंद्रावर पोहचली. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आपली सून ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेक सोबत जुहू येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोचले. तेथे तिघांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते परतत असताना त्या मतदान केंद्रावरील पोलिंग ऑफिसर म्हणजेच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. . या ठिकाणी आम्ही मतदानासाठी आलो आहोत. तुम्ही येथील अधिकारी असून फोटोसाठी मागणी किंवा विनंती तुम्ही करुच शकत नाही, अशा शब्दात जया बच्चन यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -