घरमनोरंजनमाझ्यासमोर माझे फोटो दिग्दर्शकाने कचऱ्याच्या डब्ब्यात टाकले

माझ्यासमोर माझे फोटो दिग्दर्शकाने कचऱ्याच्या डब्ब्यात टाकले

Subscribe

मनोज जोशी यांनी बॉलिवूड क्षेत्रातील संघर्षाचा प्रवास सागतांना काही गोष्टींचा खुलासा केला. सर्फरोश या चित्रपटामुळे मोठा ब्रेक मिळाला असे ही सांगितले.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना आपल्या करिअरची सुरूवात करतांना अनेक अडचणींना दूर करून आपला वेगळा ठसा निर्माण करावा लागतो. तसाच संघर्ष मोहन जोशींना करावा लागला. मनोज जोशी चित्रपसृष्टीतील नावाजलेला अभिनेता. तसेच आपल्या उत्कृष्ट अभिनयशैलीने अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. पुन्हा एकदा मनोज जोशी पी.एम नरेंद्र मोदी या बायोपिकमधून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या आगामी चित्रपटात मनोज जोशी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

- Advertisement -

आमिर खानच्या १९९९ मधील सर्फरोश या चित्रपटातून मनोज जोशी यांनी बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपटसृष्टीतील कठोर संघर्षाबद्दल मनोज जोशी यांनी या घटनेचा खुलासा केला आणि त्यानंतर त्यांनी स्वत: साठी ‘पोर्टफोलिओ शूट’ केलेच नाही. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी मोठा खुलासा केला की, एका बॉलिवूड दिग्दर्शकाने स्टूडिओमध्ये भेटायला बोलावले. या भेटी दरम्यान त्यांचा अपमान करण्यात आला. यावेळी त्यांनी एक आठवण शेअर केली ती अशी, ‘मी काम मिळावे म्हणून माझ्या पोर्टफोलिओसह स्टूडिओला भेट द्यायला जायचो. दिग्दर्शकांनी फोटो पाहून बाजूला ठेवून द्यायचे तसेच, ज्याप्रकारे ते फोटो घ्यायचे त्याप्रकारे काम लवकर देतील, असे वाटत नव्हते.’

- Advertisement -

‘एके दिवशी दिग्दर्शकाने माझे फोटो घेतले आणि माझ्यासमोरच कचऱ्याच्या डब्ब्यात टाकले.’ त्यावेळी पोर्टफोलिओ शूट करणं हे खुप खर्चिक असल्यामुळे परवडणारे ही नव्हते. या प्रसंगानंतर ऑडिशनला जाताना कोणत्याही पोर्टफोलिओ शिवाय जायचो.’ अशा प्रसंगामुळे मला धक्काच बसला. असे प्रकार घडनं हे कोणत्याही कलाकारासाठी अपमानास्पद आहे. असे पद्मश्री पुरस्कार विजेता अभिनेता मनोज जोशी यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

Thank You @presidentofindia for #padmshree

A post shared by Manoj Joshi (@actormanojjoshi) on

पीएम नरेंद्र मोदी या आगामी बायोपिकमधून विवेक ओबेरॉय सोबत पडद्यावर झळकताना दिसणार आहे, अभिनेता विवेक हा मोदींची भूमिका साकारणार असून मनोज जोशी अमित शहा यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -