घरमनोरंजन'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेनंतर अमृता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेनंतर अमृता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

येत्या ११ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर 'जिगरबाज' ही नवी मालिका सुरू होणार

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार. या आधी अमृता सोनी मराठी वाहिनीच्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजाऊ माँ साहेबांची भूमिका साकारत होती. आता अमृता एका नव्या रूपात नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोनी मराठीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेच्या माध्यमातून अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

या मालिकेत अमृता ही डॉ. अदिती हे पात्र साकारणार आहेत. एका साध्या आणि छोट्या घरातून आलेली अदिती त्यांच्या घरातली पहिली डॉक्टर मुलगी आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटावा असं काम तिला करायचं आहे. पण छोट्या गावातून आल्यामुळे थोडी भित्री आणि निर्णय घेण्यास कचरणारी अशी अदिती स्वभावानं मात्र मनमिळाऊ आणि समंजस आहे. एका साध्या आणि छोट्या घरातून आलेली अदिती त्यांच्या घरातली पहिली डॉक्टर आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटावा असे काम तिला करायचे आहे. मात्र, छोट्या गावातून आल्यामुळे ती थोडी भित्री असल्याचे दिसून येते.

येत्या ११ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर ‘जिगरबाज’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अरुण नलावडे, प्रतीक्षा लोणकर यांसारखे दिगज्ज कलाकारांसह काही तरुण कलाकारही झळकणार आहेत.


सुबोध भावेची ‘चंद्र आहे साक्षीला’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -