घरमुंबईवैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Subscribe

१६ ऑक्टोबरला नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीईटी सेलकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात केली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर नीटचा निकाल यंदा विलंबाने जाहीर झाला. १६ ऑक्टोबरला नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीईटी सेलकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५ नोव्हेंबरपासून नोदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर १५ नोव्हेंबरला पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलमार्फत ५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. https://cetcell.net/UG NEET २०२० या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. सीईटी सेलकडून ४ नोव्हेंबरला प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीपत्रक संकेतस्थळावर जाहीर केले. यामध्ये उपलब्ध जागांची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ६ ते १३ नोव्हेंबरपर्यंत एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम ऑनलाईन भरायचा आहे. एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती यादी १३ नोव्हेंबरला तर पहिली गुणवत्ता यादी १५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस,बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अ‍ॅण्ड ओ, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सीईटी सेलकडून सांगण्यात आली आहे.

- Advertisement -

mbbs table

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -