घरमहाराष्ट्रनाशिकखाणीमध्ये बुडून तिघांचा मृत्यू

खाणीमध्ये बुडून तिघांचा मृत्यू

Subscribe

नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या सय्यदपिंप्री येथे खाणीमधील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी, ४ एप्रिलला घडली.

नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या सय्यदपिंप्री येथे खाणीमधील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी, ४ एप्रिलला घडली. मृतांमध्ये नंदू वराडे, त्यांची पत्नी सविता वराडे आणि पुतण्या केशव वराडे यांचा समावेश आहे.

खाणीत १५ फुटांपर्यंत पाणी असून, सकाळच्या सुमारास सविता वराडे या कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या. त्या अचानक पाण्यात पडल्याने त्यांना वाचविण्यासाठी पती नंदू वराडे हे मदतीला धावून गेले. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने, दोघांना वाचविण्यासाठी पुतण्या केशव वराडे यानेही पाण्यात उडी घेतली. त्यात तिघांचाही बुडून मृत्यू झाला. अडीच तास शोध घेतल्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तिघांनाही उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या जागेवरील या खाणींच्या असुरक्षिततेचा मुद्दाही यानिमित्ताने पुढे आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -