घरमनोरंजनपाकिस्तानी क्रिकेटर 'या' बॉलीवूड हिरोचा चाहता

पाकिस्तानी क्रिकेटर ‘या’ बॉलीवूड हिरोचा चाहता

Subscribe

क्रिकेट आणि बॉलीवूडचं कनेक्शन आपल्याकडे जुनं नाही. शर्मिला टागोर आणि मन्सुर अली खान पतवडीपासून ते विराट आणि अनुष्कापर्यंत, बॉलीवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या अनेक जोड्या आपण आजवर पाहिल्या आहेत. मात्र, हे कनेक्शन पूर्णत: वेगळं आहे. एक पाकिस्तानी क्रिकेटर चक्क एका बॉलीवूड अभिनेत्याचा चाहता बनला आहे. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा फास्ट बॉलर- मोहम्मद आमिर. ‘अभिनेता शाहीद कपूर याच्या अभिनयाचे आपण चाहते बनलो आहोत’, असं वक्तव्य आमिर याने केलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटल्या दिलेल्या मुलाखातीत ‘मी शाहीद कपूरचा चाहता बनलो असून, मला त्याचा अभिनय खूप आवडतो’, असं आमिर याने सांगितलं. आपल्या खासगी आणि क्रिकेट जीवनाविषयी बोलताना आमिरने याचीही उल्लेख केला. असं म्हणतात की, कोण कधी आणि कुणाचा फॅन बनेल याचा काही नेम नसतो. याचीच प्रचिती या उदाहरणावरुन पुन्हा एकदा आल्याचं म्हणावं लागेल.

का बनला शाहीदचा फॅन?

मुलाखतीदरम्यान आमिरने तो शाहीदचा चाहता का बनला याचा खुलासा केला. याबद्दल चर्चा करताना अामिर म्हणाला, ”मी काही दिवसांपूर्वी शाहीद कपूरचा पद्मावत हा चित्रपट पाहिला. त्यामध्ये शाहीदने साकारलेली भूमिका खूपच अप्रतिम होती. शाहीदचा त्यातील अभिनयही दमदार होता. त्यामुळे या खऱ्या अर्थाने पद्मावर पाहिल्यानंतर मी शाहीदचा आणि त्याच्या अभिनयाचा फॅन झालो.

- Advertisement -

shahid kapoor padmavat

माझ्या ‘बायोपिक’साठी शाहीदच

या मुलाखतीदरम्यान मोहम्मद आमिरने त्याची आणखी एक मगतीशीर इच्छा बोलून दाखवली. मुलाखतीमध्ये आमिरला विचारण्यात आले की, ‘त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आला तर कोणत्या बॉलीवूड हिरोची निवड केली जावी?’. यावर क्षणाचाही वेळ न घालवता आमिरने शाहीद कपूर असं उत्तर दिलं. ‘मी शाहिदचा इतका मोठा फॅन बनलो आहे, की माझा बायोपिक बनल्यास त्यामध्ये शाहीदनेच काम करावं’, अशी इच्छा आमिरने बोलवून दाखवली.

- Advertisement -

Shahid Kapoor

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -