घरमनोरंजनमोतीचूर चकनाचूर: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टीचा हटके लूक

मोतीचूर चकनाचूर: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टीचा हटके लूक

Subscribe

मोतीचूर चकनाचूर या नवीन चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार अथिया शेट्टी सोबत. दोघेही लग्नासाठी हताश अशा भूमिकेत आहेत.

नेहमी गंभीर भूमिकेत दिसणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच अथिया शेट्टी सोबत एका विनोदी चित्रपटात दिसणार आहे. ‘मोतीचूर चकनाचूर’ या आगामी चित्रपटात एका ३६ वर्षीय लग्नाळू व्यक्तीची कथा दाखविण्यात आली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. नवाजुद्दीन नवरदेवच्या गेटअपमध्ये दिसत असून सुनिल शेट्टीची कन्या अथिया नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे. लग्न आणि हनिमूनसाठी ते फिरायला जात असल्याचा प्रसंग पोस्टरमधून दिसून येत आहे.

- Advertisement -

नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये दोघांचंही नवीन लग्न झालेलं दिसतय. या पोस्टरमध्ये नवाजुद्दिन मध्यम वयीन तरुण दाखवला असून तो लग्नानंतर संतुष्ट दिसतोय. तर नववधू अथिया लग्नानंतर जग फिरण्यासाठी उत्सूक झालेली पाहायला मिळत आहे. दोघांनीही या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला आहे.

- Advertisement -

सेक्रेड गेम्समधील अँग्री यंग मॅन गणेश गायतोंड साकारलेला नवाजुद्दीन मोतीचूरमध्ये लग्नासाठी आतूर असलेल्या पुष्पेंदरची भूमिका साकारत आहे. ‘मुबारकण’ या चित्रपटानंतर विस्मृतीत गेलेली अथिया शेट्टीला आता नवाजुद्दीनसोबत ब्रेक मिळालाय. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी यांची हटके जोडी या चित्रपटाला अधिक मनोरंजक बनवते. चित्रपट रिलीज करण्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्य, खेर १६ नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

नवाजुद्दीन गंभीर भूमिकांसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र कॉमेडी भूमिका देखील तो तितक्याच ताकदीने साकारतो. बजरंगी भाईजान आणि फ्रीकी अली या चित्रपटांमधून त्याने कॉमेडी भूमिका निभावली होती. बऱ्याच काळानंतर नवाजुद्दिन आता चित्रपटातून त्याच्या चाहत्यांना भेटायला येत असल्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. तसेच अथियाला या चित्रपटानंतर तरी प्रेक्षक स्वीकारतील का? ते ही कळेलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -