घरट्रेंडिंगनिवडणूक प्रचारात रॅप साँगची चलती; पाहा व्हिडिओ

निवडणूक प्रचारात रॅप साँगची चलती; पाहा व्हिडिओ

Subscribe

मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी रॅप साँग लाँच केले आहे.

निवडणूक आली की मतदारांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार प्रचारासाठी काहीतरी नवे फंडे वापरतात. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देखील प्रचाराचे हटके फंडे वापरले जात आहेत. रणवीर सिंगच्या गली बॉय आणि त्याच्यातील रॅप साँगची चलती पाहता यावर्षी अनेकांनी आपापले रॅप साँग बनवून ते सोशल मीडियावर प्रसारीत केले आहे. नवमतदारांना आकर्षित करणे आणि आपले मुद्दे त्यांच्यापर्यंत नेण्याची ही आयडीया सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी रॅप साँग बनवून त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केली आहे. राष्ट्रवादीने रोजगार, महागाई या प्रश्नांना रॅप साँगमधून हात घातला आहे. तर अब की बार, अब की बार म्हणत गंडवलंय बार बार… अशी काही कडवी टाकून सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

तर मनसेकडून प्रसारीत केलेल्या व्हिडिओतही सरकारवर शरसंधान साधलेले आहे. “दोन्ही पक्ष युतीसाठी करतात तडजोड, आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही करतो तोडफोड”. आता जोरात धावेल मनसेचे इंजिन असे म्हणत मराठी माणसांना मतदानासाठी आवाहन केले आहे. तर शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रदिप शर्मा यांचे देखील रॅप साँग आलेले आहे. गली बॉयच्या शेर आया, शेर आया या थिमवर हे गाणे बनवले असून प्रदिप शर्मा यांची डॅशिंग इमेज या व्हिडिओतून अधोरेखित करण्यात आली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणारी पिढी ही २००० सालाच्या आसपास जन्मलेली आहे. मोबाईल हातात घेऊन जन्मलेली ही पिढी स्मार्टफोनसारखीच स्मार्ट आहे. त्यामुळे या नवमतदारांना आकर्षित करेल, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करेल अशा माध्यमाची निवड राजकीय पक्षांनी केलेली दिसते. जास्तीत जास्त काळ सोशल मीडियावर असणाऱ्या या नवमतदारांना हे रॅप साँग आपली अभिव्यक्ती वाटत आहे. मात्र त्याचे मतांमध्ये किती रुपांतर होईल, हे मात्र २४ ऑक्टोबर रोजीच दिसेल.

- Advertisement -

राज ठाकरे यांचे रॅप साँग –

मनसे Rap Song |Raj Thackrey|MNS |Rohan Kale???????

राजसमर्थक ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 7, 2019

 

प्रदिप शर्मा यांचे रॅप साँग –

शेर आया .. शेर आया !

शेर आया …. शेर आया !

Pradeep Sharma FAN's ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 11, 2019

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे रॅप साँग –

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -