घरमनोरंजन'सन्नी पवार' ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार

‘सन्नी पवार’ ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार

Subscribe

सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

बालकलाकार सन्नी पवारने चित्रपटसृष्टीत मोठी कामगिरी केली आहे. १९व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सन्नी पवार मुंबईत कलिना येथे एका झोपडपट्टीमध्ये राहतो. हा पुरस्कार पटकवल्यामुळे पुन्हा एकदा भारताची मान जागतिक सिनेसृष्टीत उंचावली आहे.

- Advertisement -

१९ व्या एनवायआयएफएफ मध्ये अनेक हिंदी आणि भारतीय प्रादेशिक भाषांतील सिनेमांचे सादरीकरण आले. त्यात लेखक- दिग्दर्शक सफरदार रेहमान यांच्या ‘चिप्पा’ सिनेमाचा समावेश होता. रस्त्यावर राहणाऱ्या एका लहान मुलाच्या इच्छा-आकांशाची कहाणी ‘चिप्पा’ मध्ये आहे. चिप्पा मधून या लहान मुलांची गोष्ट सांगितली आहे. सन्नी हा स्वत: एका झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याने हे दुख: भोगलेलं आहे. सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

- Advertisement -

या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सचिनने म्हटले की, पुरस्कार मिळाल्याने मी खूपच खूश आहे. याचे सर्व श्रेय माझ्या पालकांना जाते. मला रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी भविष्यातही करायची आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -